Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

आयआयसीए आणि कार्बन मार्केट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यात सामंजस्य करार

आयआयसीए आणि कार्बन मार्केट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यात सामंजस्य करार

 

  • भारताच्या कार्बन बाजारपेठेला बळकटी देण्याच्या, आणि कार्बनमुक्तीच्या प्रयत्नांना चालना देण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल म्हणून, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए) आणि कार्बन मार्केट असोसिएशन ऑफ इंडिया (सीएमएआय) यांच्यात नवी दिल्ली येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली.
  • रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 4 फेब्रुवारी रोजी आयआयसीए-सीएमएआय च्या जागतिक आणि भारतीय कार्बन बाजार विषयक मास्टरक्लासच्या उद्घाटन प्रसंगी या ऐतिहासिक कराराची घोषणा झाली.
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी भारताच्या आर्थिक आणि पर्यावरण विषयक भवितव्याला आकार देण्यात जैवइंधन आणि हरित हायड्रोजनच्या असलेल्या महत्वाच्या भूमिकेवर भर दिला.
  • त्यांनी बायो बिटुमिन, बायो एव्हिएशन-इंधन, बायो सीएनजीशी संबंधित पथदर्शी प्रकल्पांची माहिती दिली आणि “ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर हे भविष्य असून, कोणतेही साहित्य वाया जात नाही” यावर प्रकाश टाकला.
  • उद्योग व्यावसायिक, धोरणकर्ते आणि शिक्षण तज्ञांना भारताच्या विकसित होत असलेल्या कार्बन बाजारपेठेत मार्ग शोधण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्याने सुसज्ज करणे, हे  या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट आहे.
  • सीएमएआय, ही शाश्वत व्यावसायिक उपक्रमांना गती देण्यावर लक्ष केंद्रित करणारी अग्रगण्य उद्योग संघटना, भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राचा विकास आणि विस्तारला मदत करण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयांतर्गत, आयआयसीए या थिंक टँकचा नॉलेज पार्टनर म्हणून काम करेल.

 

या करारानुसार, सीएमएआय आणि आयआयसीए पुढील बाबींमध्ये सहकार्य करतील:

  • प्रशिक्षण कार्यक्रम: कार्बन बाजारपेठ, औद्योगिक क्षेत्राचे कार्बन उत्सर्जन रोखणारे उपाय आणि शाश्वत वित्त सहकार्य यावर अभ्यासक्रम विकसित करणे आणि वितरित करणे.
  • संयुक्त संशोधन: निष्कार्बनीकरण (कार्बन उत्सर्जन रोखणे) रणनीती आणि कार्बन ट्रेडिंग यंत्रणेवरील अभ्यास आणि दृष्टीकोन प्रकाशित करणे.
  • कार्यशाळा आणि संमेलन: उद्योग क्षेत्रातील भागधारक, धोरणकर्ते आणि शिक्षण तज्ञ यांच्यात संवाद सुलभ करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन.
  • धोरण प्रचार: भारताच्या निव्वळ शून्य उत्सर्जन उद्दिष्टाला चालना देणाऱ्या नियामक आणि धोरणात्मक चौकटींना समर्थन देणे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *