● भारताचे वाढते जहाजबांधणी सामर्थ्य आणि स्वयंपूर्ण बनण्याच्या दिशेने वाटचालीचा दाखला म्हणून, प्रोजेक्ट 17ए च्या दोन बहु-उद्देशी युद्धनौका – आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी यांचा -26,ऑगस्ट 2025 रोजी विशाखापट्टणम येथील नौदल तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलात समावेश करण्यात आला.
● माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल), मुंबई [आयएनएस उदयगिरी] आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (जीआरएसई), कोलकाता [आयएनएस हिमगिरी] – या दोन वेगवेगळ्या शिपयार्ड्सनी स्वदेशी पद्धतीने बांधणी केलेल्या दोन आघाडीच्या युद्धनौका प्रथमच एकाच वेळी नौदलात दाखल करण्यात आल्या आहेत.
● आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी या प्रोजेक्ट 17 (शिवालिक श्रेणी) वर्गातील प्रमुख जहाज आयएनएस नीलगिरीच्या उत्तराधिकारी आहेत.
● यामध्ये सुधारित स्टेल्थ वैशिष्ट्ये, कमी रडार सिग्नेचर,टेहळणीसाठी प्रगत रडार आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, सुपरसॉनिक पृष्ठभाग ते पृष्ठभाग क्षेपणास्त्रे, पृष्ठभागावरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रे आणि रॅपिड -फायर गन प्रणाली समाविष्ट आहेत.
● दोन्ही जहाजांमध्ये एकत्रित डिझेल किंवा गॅस प्रोपल्शन प्लांट आणि अत्याधुनिक एकात्मिक प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणाली आहे, ज्यामुळे उच्च वेग आणि सुधारित इंधन कार्यक्षमता साधता येते.
● भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने स्वतः डिझाइन केलेल्या आणि भारतात निर्मित या 100 व्या आणि 101व्या युद्धनौका आहेत, ज्या स्वदेशी सामग्री आणि स्वयंपूर्णता वाढवण्याप्रति नौदलाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतिबिंब आहेत.
● अनेक एमएसएमईंच्या सहभागामुळे आणि भारतीय मूळ उपकरण उत्पादकांकडून प्रमुख शस्त्रे आणि सेन्सर्स खरेदीद्वारे 75% पेक्षा अधिक उच्च स्वदेशी सामग्री वापरणे शक्य झाले आहे.



