आयुर्वेद दिन
- दरवर्षी29 ऑक्टोबर रोजी आयुर्वेद दिवस साजरा करण्यात येतो.
- 2024 मध्ये जगभरातील 150 पेक्षा जास्त देश आयुर्वेद दिवस साजरा करत आहेत.
- सन2016 पासून धन्वंतरी जयंती (धनत्रयोदशीच्या) मुहूर्तावर आयुर्वेद दिवस साजरा केला जातो.
- 2024 यावर्षी 9 वा आयुर्वेद साजरा केला जात आहे.
- यानिमित्तानं आयुष मंत्रालय नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्सिट्यूट ऑफ आयुर्वेद येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
थीम:
- दरवर्षीवेगवेगळ्या थीमवर नॅशनल आयुर्वेद डे साजरा केला जातो. “जागतिक आरोग्यासाठी आयुर्वेद नवकल्पना“ ही या वर्षाची आयुर्वेद दिनाची थिम आहे.
‘सी – 295 ‘ भारतात तयार होणारे पहिले विमान
- पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या हस्ते 28 ऑक्टोबर रोजी बडोदा येथील ‘टाटा- एअरबस’ कारखान्याचे उद्घाटन झाले.
- याप्रकल्पात ‘सी-295’ या मालवाहू विमानांची निर्मिती करण्यात येणार आहे.
- एखाद्याखासगी कंपनीत तयार होणारे ‘सी-295’ हे देशातील पहिले विमान असेल.
- ‘हाकारखाना म्हणजे नव्या भारताचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी या वेळी केले.
- याप्रकल्पाचे भूमिपूजन ऑक्टोबर 2022 मध्ये झाले होते.
प्रकल्प काय आहे?
- गुजरातमधीलबडोदा येथे टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्स आहे.
- तेथेआता स्पॅनिश बनावटीच्या ‘सी 295’ विमानांचे उत्पादन केले जाणार आहे. ते स्पेनच्या एअरबस कंपनीच्या संयुक्त भागीदारीत होणार आहे.
- हाभारतातील पहिला खासगी विमान प्रकल्प ठरणार आहे.
प्रकल्पाचा फायदा काय?
- येथूनउत्पादित होणारी सी 295 विमाने रशियन बनावटीची अँटोनोव्ह एएन 32 आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्सने उत्पादित केलेली मात्र आता कालबाह्य होऊ लागलेली अॅव्हरो 748 या विमानांची जागा घेतील.
- संरक्षणालाबळकटी मिळेल.
- सी295 ही तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अॅव्हरो 748 पेक्षा प्रगत आहेत.
- प्रकल्पामुळे’मेक इन इंडिया’ मोहिमेला बळ मिळेल.
‘सी-295′ची वैशिष्ट्ये
- मध्यमआकाराचे सामरिक मालवाहू विमान
- वैद्यकीयआणीबाणी, संकटकाळात आणि सागरी टेहळणीसाठीदेखील वापर
- स्पेनमधील’सीएएसए’ कंपनीकडून सुरुवातीला रचना आणि निर्मिती
- भारतानेखरेदी केलेल्या 56 विमानांपैकी 16 थेट ‘एअरबस’कडून खरेदी, तर 40 विमानांची बडोद्यात निर्मिती
- कमालभार मर्यादा : एकावेळी 9 टन
- कमालवेग मर्यादा : ताशी 482 किलोमीटर
दोन नव्या वेगवान गस्ती नौकांचे जलावतरण
- भारतीयतट रक्षक दलाने ‘अदम्य’ आणि ‘अक्षर’ या दोन नव्या द्रुतगती गस्ती नौकांचे (एफपीव्ही) 28 ऑक्टोबर 2024 ला जलावतरण केले.
- यानौका गोवा शिपयार्ड लि. (जीएसएल) कंपनीने बांधल्या असून त्यामध्ये 60% पेक्षा अधिक भाग देशी बनावटीचे आहेत.
- आठएफपीव्ही बांधण्यासाठी जीएसएलला 473 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले असून या नौका त्यातील पहिल्या दोन आहेत.
- सागरीक्षेत्र आणि बेटांचे संरक्षण, नियमन, नियंत्रण आणि गस्तीसाठी ही अत्याधुनिक एफपीव्ही तट रक्षक दलास उपयुक्त ठरतील.
- प्रत्येकएफपीव्हीची लांबी 52 मी, रुंदी 8 मी असून 27 क्नॉट (सागरी मैल अंतर कापण्याच्या गतीचे एकक) इतकी सर्वोच्च गती गाठण्याची क्षमता या वाहनात आहे.
- भारतीयनौवहन नोंदणी आणि अमेरिकी नौवहन ब्युरोच्या दुहेरी श्रेणी प्रमाणीकरण निकषांची पूर्तता करतानाच भारतीय तट रक्षक दलाच्या विशिष्ट आवश्यकता लक्षात घेऊन या नौकांची आखणी आणि बांधणी करण्यात आली आहे.
- अत्याधुनिकशिप लिफ्ट यंत्रणा वापरून प्रथमच दोन एफपीव्हीचे एकाच वेळी जलावतरण करण्यात आले.
- भारतीयतट रक्षक दलाचे महासंचालक परमेश शिवमणी यांच्या उपस्थितीत प्रिया परमेश यांनी समारंभपूर्वक या एफपीव्हीचे उद्घाटन आणि नामकरण केले.
- भारतीयतट रक्षक दलासाठी जहाज बांधणी करताना देशी बनावटीचे साहित्य वापरल्याबद्दल जीएसएलसह इतर संबंधित कंपन्यांच्या प्रयत्नांची महासंचालकांनी प्रशंसा केली.
आयएनएस तलवार फ्रान्समधील ला रियुनियन येथे दाखल
- भारतीयनौदलातील आघाडीची स्टेल्थ फ्रिगेट ‘आयएनएस तलवार’ हिंद महासागर क्षेत्रात तिच्या सध्याच्या तैनातीचा एक भाग म्हणून 27 ऑक्टोबर 2024 रोजी फ्रान्समधील ला रियुनियन येथे पोहोचली.
- प्रादेशिकसागरी सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत-फ्रान्स भागीदारी मजबूत करणे हे ला रियुनियन भेटीचे उद्दिष्ट आहे.
- याबंदर भेटीदरम्यान, या जहाजावरील अधिकारी क्रॉस-डेक भेटी देतील आणि फ्रेंच नौदलाशी संवादही साधतील. यापूर्वी, 27 ऑक्टोबर 2024 रोजी हे जहाज भारतीय समुदायाकरिता भेटीसाठी खुले ठेवण्यात आले होते.
- भारतआणि फ्रान्समध्ये पारंपरिकरित्या मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि दोन्ही देशात सखोल, चिरस्थायी धोरणात्मक भागीदारी आहे.
- आयएनएसतलवार 18 जून 2003 रोजी भारतीय नौदलात सामील झाले आणि ते भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडच्या अंतर्गत असलेल्या पश्चिमी ताफ्याचा एक भाग आहे.
- याजहाजाचे नेतृत्व सध्या कॅप्टन जिथू जॉर्ज करत आहेत.
- याजहाजाने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयबीएसएएमएआर VIII बहुपक्षीय युद्ध सरावात भाग घेतला होता.
जागतिक कुस्ती स्पर्धेत चिरागला सुवर्णपदक
- भारताच्याचिराग चिकाराने 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत फ्री-स्टाइल प्रकारात 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
- जागतिकस्पर्धेत विजेतेपद मिळवणारा चिकारा भारताचा तिसराच मल्ल ठरला.
- स्पर्धेच्याअंतिम फेरीत चिकाराने संघर्षपूर्ण लढतीत किर्गिझस्तानच्या अब्दिमलिक काराचोव्हचे आव्हान अगदी अखेरच्या सेकंदाला 4-4 असे परतवून लावत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
- पॅरिसऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या अमन सेहरावतनंतर 23 वर्षांखालील जागतिक गटात विजेतेपद मिळवणारा चिराग दुसराच पुरुष मल्ल ठरला.
- अमनने2022 मध्ये याच स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती.
- मागीलवर्षी (2023) रितिका हुडाने 76 किलो वजनी गटात अशीच सुवर्ण कामगिरी करून दाखवली होती. अशी कामगिरी करणारी रितिका पहिलीच भारतीय महिला ठरली होती.
- ऑलिम्पिकरौप्यपदक विजेता रवि कुमार दहिया 2018 मध्ये याच स्पर्धेत रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता.
- चिरागहा हरियाणामधील सोनपत याठिकाणचे प्रतिनिधित्व करतो.
- यास्पर्धेत एक सुवर्णपदकासाहित एकूण 9 पदके मिळाली आहेत
- 2024 मधीलही 23 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धा अलबेनियातील तिराणा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.



