● केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) कार्यकारी संचालकपदी नियुक्ती केली.
● तीन वर्षांसाठी ही नियुक्ती असणार आहे.
● सरकारने के. व्ही. सुब्रमण्यम यांना 30 एप्रिल रोजी या पदावरून हटवले होते.
● सुब्रमण्यम यांच्या जागी पटेल यांची नियुक्ती झाली आहे.
● आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी मंडळात 25 संचालक असतात.
● उर्जित पटेल यांनी यापूर्वी RBI चे 24 वे गव्हर्नर म्हणून काम पाहिले होते.सप्टेंबर 2016 ते डिसेंबर 2018 या कालावधीत ते आरबीआयचे गव्हर्नर होते.
● यापूर्वीही उर्जित पटेल यांनी आयएमएफमध्ये पाच वर्षे काम केले आहे.
● त्यांनी 1992 मध्ये प्रथम वॉशिंग्टन डी.सी. आणि नंतर नवी दिल्ली येथे आयएमएफचे उपनिवासी प्रतिनिधी म्हणूनही काम केले होते.
● आरबीआय गव्हर्नर होण्यापूर्वी, त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे उपनिवासी प्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे. जिथे त्यांनी चलनविषयक धोरण आणि संशोधन यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळल्या.
● त्यांनी 1998 ते 2001 पर्यंत अर्थ मंत्रालयात सल्लागार म्हणूनही काम केले. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज, आयडीएफसी लिमिटेड, एमसीएक्स लिमिटेड आणि गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशनसह सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात इतर पदांवरही काम केले आहे.
● 2000 ते 2004 दरम्यान, पटेल यांनी अनेक उच्चस्तरीय राज्य आणि केंद्रीय समित्यांवर काम केले आहे.
● यामध्ये प्रत्यक्ष कर टास्क फोर्स, अर्थ मंत्रालय, संशोधन प्रकल्प आणि शेअर बाजार अभ्यास सल्लागार समिती, भारतीय स्पर्धा आयोग, पंतप्रधानांच्या पायाभूत सुविधा टास्क फोर्ससाठी सचिवालय, दूरसंचार मंत्र्यांचा गट आणि नागरी विमान वाहतूक सुधारणा समिती इत्यादींचा समावेश आहे.
● पटेल यांनी भारतीय मॅक्रो अर्थव्यवस्थेवर अनेक तांत्रिक प्रकाशने, कागदपत्रे आणि भाष्ये देखील लिहिली आहेत.
● उर्जित पटेल यांनी येल विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी, ऑक्सफर्ड विद्यापीठातून एम.फिल आणि लंडन विद्यापीठातून बी.एससी. केले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
● आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ही एक जागतिक वित्तीय संस्था आहे, जी सदस्य देशांना आर्थिक सहकार्य पुरवून जागतिक आर्थिक स्थिरता, उच्च रोजगार, शाश्वत आर्थिक वाढ आणि व्यापार सुलभ करते.
● तिचे मुख्य उद्दिष्टे जागतिक अर्थव्यवस्थेचे निरीक्षण करणे, सदस्य राष्ट्रांना आर्थिक धोरणांवर सल्ला देणे आणि आर्थिक संकटात असलेल्या देशांना मदत करणे आहे.
● स्थापना : 27 डिसेंबर 1945
● मुख्यालय : मुख्यालयवॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका
● व्यवस्थापकीय संचालक : क्रिस्टालिना जॉर्जिव्हा