Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शहा

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शहा

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शहा

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
  • गेल्या पाच वर्षापासून ‘बीसीसीआय’चे सचिव म्हणून काम पाहणारे 36 वर्षीय जय शहा भारताचे पाचवे आणि सर्वात तरुण ‘आयसीसी’ अध्यक्ष ठरले आहेत.
  • मावळते अध्यक्ष न्यूझीलंडचे ग्रेग बर्कले यांनी तिसऱ्यांदा पदावर राहण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या जागी जय शहा यांची एकमताने निवड करण्यात आली.
  • यापूर्वी जगमोहन दालमिया, शरद पवार, शशांक मनोहर आणि एन. श्रीनिवासन हे भारतीय ‘आयसीसी’चे अध्यक्ष राहिले आहेत.

आयसीसी:

  • स्थापना : 15 जून 1909
  • अध्यक्ष : जय शहा
  • मुख्यालय : दुबई

बीसीसीआय:

  • स्थापना: 1 डिसें.1928
  • अध्यक्ष: रॉजर बिन्नी
  • मुख्यालय : मुंबई

पी. व्ही. सिंधू , लक्ष्य सेन विजेते

  • दोन वेळची ऑलिंपिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू व पॅरिस ऑलिंपिकमध्ये थोडक्यात पदक हुकलेला लक्ष्य सेन यांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपला.
  • सिंधू हिने महिला एकेरीत, तर लक्ष्यने पुरुष एकेरीत जेतेपदाला गवसणी घातली.
  • सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत यजमान भारतातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
  • सिंधू व लक्ष्य यांच्यासह ट्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद या जोडीने महिला दुहेरीत अजिंक्य होण्याचा मान संपादन केला.
  • सिंधू ने या स्पर्धेत तिसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावले.
  • याआधी सिंधूने 2017 आणि 2022 मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

पहिली महिला भारतीय जोडी

  • ट्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद या जोडीने महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत बाओ जिंग – ली कियान या चीनच्या जोडीवर 21-18, 21-11 अशी मात केली.
  • सुपर 300 स्पर्धा जिंकण्याची या जोडीची ही पहिलीच खेप होय,
  • तसेच सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी ट्रिसा-गायत्री ही भारताची पहिली महिला दुहेरीची जोडी ठरली आहे.
  • या स्पर्धा लखनौ येथे संपन्न झाल्या.

एफबीआयच्या प्रमुखपदी काश पटेल

  • भारतीय वंशाचे काश पटेल आता अमेरिकेतील तपास यंत्रणा FBI (Federal Bureau of Investigation) चे नवे अध्यक्ष असतील.
  • अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
  • एफबीआय या तपास संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणारे ते पहिलेच भारतीय अमेरिकन व्यक्ती असतील.
  • काश पटेल (वय 44) यांचे मूळ नाव कश्यप पटेल असं असून ते अमेरिकेतील एक प्रसिद्ध वकील आहेत.
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान काश पटेल अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे चीफ ऑफ स्टाफ राहिले आहेत.
  • अयोध्येत ज्यावेळी राम मंदिराची निर्मिती केली होती त्यावेळी त्याचं समर्थन काश पटेल यांनी केलं होतं.

फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ( FBI )

  • ही युनायटेड स्टेट्सची देशांतर्गत गुप्तचर आणि सुरक्षा सेवा आणि तिची प्रमुख फेडरल कायदा अंमलबजावणी एजन्सी आहे .
  • युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ जस्टिसची एक एजन्सी , एफबीआय ही यूएस इंटेलिजन्स कम्युनिटीची सदस्य आहे आणि ॲटर्नी जनरल आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालक या दोघांनाही अहवाल देते .
  • स्थापना : 26 जुलै 1908
  • मुख्यालय : वाशिंग्टन डी. सी.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *