- श्रीलंकेतील तमिळ नागरिकांच्या न्याय आणि सन्मानासाठी जीवन समर्पित करणारे ज्येष्ठ राजकारणी आणि तमिळ नेते आर. संपतन यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.
- आर. संपतन श्रीलंकेतील तमिळ नॅशनल अलायन्सचे 2004 पासून नेतृत्व करीत होते.
- सिंहला समाज बहुसंख्य असलेल्या श्रीलंकेमध्ये ते प्रमुख विरोधी नेते होणारे दुसरे नेते होते. अनेक दिवसांपासून ते आजारी होते.
- श्रीलंकेतील विभाजन दूर करण्यासाठी संपतन यांनी न थकता काम केले.



