- बँकॉक येथे पार पडलेल्या आशियाई एथलेटिक्स स्पर्धेत 6 सुवर्ण, 12 रौप्य, 9 कांस्य पदकांसह भारताने 27 पदके जिंकत पदकतालिकेत तिसरे स्थान पटकावले.
- भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. याआधी भारताने यजमानपद भूषविताना 2017 मध्ये भुवनेश्वर या ठिकाणी देखील 27 पदके जिंकली होती.
- या स्पर्धेत जपानने 37 पदकांसह पहिले स्थान तर चीनने 22 पदकांसह दुसरे स्थान पटकावले.
- भारतापेक्षा 2 सुवर्णपदक अधिक मिळवल्याने चीनने दुसरे स्थान काबीज केले आहे. एकूण पदके मात्र भरताने चीनच्या तुलनेत अधिक जिंकली आहेत.
- भारताने या स्पर्धेत महिलांच्या गोळाफेक व चालण्याच्या 20 किलोमीटरमध्ये स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पदक जिंकले आहे.


