- पोलंडच्या इगा स्वीअनटेकने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले .
- अंतिम लढतीत इगाने इटलीच्या जॅस्मिन पाओलिनीचा 6-2, 6-1 असा पराभव केला
- इगाने चौथ्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले यापूर्वी तिने 2020, 2022, 2023 आणि आता 2004 मध्ये ही स्पर्धा जिंकली .
- या वर्षी फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इगाने हॅट्रिक साधली.
- इगाचे हे एकूण पाचवे ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले तिने चार वेळा फ्रेंच ओपन आणि एक वेळेस अमेरिकन ओपन (2022) स्पर्धा जिंकली आहे.
- सर्वात कमी वयात महिला एकेरीची पाच ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारी 2002 नंतरची पहिलीच खेळाडू ठरली.
- यापूर्वी अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने 2002 मध्ये अशी कामगिरी केली होती .
‘विक्रमांची राणी’
- फ्रेंच स्पर्धेत सलग तीन विजेतेपदे मिळवणारी स्वीअनटेक 2007 पासूनची पहिलीच महिला टेनिसपटू ठरली.
- या स्पर्धेत यापूर्वी केवळ मोनिका सेलेस (1990, 1991, 1992) आणि जस्टिन हेनिन (2005, 2006, 2007) यांनीच अशी कामगिरी केली आहे.
- फ्रेंच स्पर्धेत महिला एकेरीत सर्वाधिक 7 जेतेपदे ख्रिस एव्हर्ट लॉईडच्या(अमेरिका) नावावर असून, त्यानंतर स्टेफी ग्राफने(जर्मनी) 6 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
- स्वीअनटेकने चौथे विजेतेपद मिळवताना हेनिनच्या कामगिरीशी बरोबरी केली.
फ्रेंच ओपन:-
- फ्रेंच ओपन ज्याला रोलँड-गॅरोस म्हणूनही ओळखले जाते .
- ही एक प्रमुख टेनिस स्पर्धा आहे जी फ्रान्सच्या पॅरिसमधील स्टेड रोलँड गॅरोस येथे दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीत सुरू झाली आहे.
- टूर्नामेंट आणि ठिकाणाची नावे फ्रेंच वैमानिक रोलँड गॅरोस याच्या नावावर आहे .
- फ्रेंच ओपन ही जगातील प्रमुख क्ले कोर्ट चॅम्पियनशिप आहे आणि सध्या या पृष्ठभागावर होणारी एकमेव ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे.
- कालक्रमानुसार ही चार वार्षिक ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी दुसरी आहे.ऑस्ट्रेलियन ओपननंतर आणि विम्बल्डन आणि यूएस ओपनच्या आधी .
- 1975 पर्यंत, फ्रेंच ओपन ही एकमेव मोठी स्पर्धा होती जी गवतावर खेळली जात नव्हती .
- चॅम्पियनशिपसाठी आवश्यक असलेल्या सात फेऱ्या, मातीच्या पृष्ठभागाची वैशिष्ट्ये (मंद गती, उच्च बाउंस) आणि पुरुष एकेरीतील पाच सेटमधील सर्वोत्तम सामने, फ्रेंच ओपन ही जगातील सर्वात शारीरिकदृष्ट्या मागणी असलेली टेनिस स्पर्धा म्हणून ओळखली जाते
- सुरवात :- 1891
- 2024 ही एकूण 123 वी स्पर्धा होती.
- ही स्पर्धा क्ले कोर्ट वर खेळवली जाते