भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) 17 फेब्रुवारीला ‘इन्सॅट-३ डीएस’ या हवामानशास्त्रीय उपग्रहाचे उत्पादकांना प्रक्षेपण करण्यात येणार आहे. ‘इन्सॅट- ३ डीएस’च्या साह्याने अद्ययावत हवामानशास्त्रीय सुविधा पुरविण्यात येणार असून, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या निधीतून या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे.
अधिक माहिती
● भारताचे ‘इन्सॅट-3 डी’ आणि ‘इन्सॅट-3 डीआर’ हे दोन हवामानशास्त्रीय उपग्रह सध्या पृथ्वीभोवतीच्या भूस्थिर कक्षेत कार्यरत आहेत.
● ‘इन्सॅट-3 डीएस’ या तिसऱ्या उपग्रहामुळे हवामानशास्त्रीय निरीक्षणे, संशोधन आणि सुविधा अद्ययावत होणार आहेत.
● देशातील उद्योगांचाही या उपग्रहाच्या निर्मितीत सहभाग आहे.
● 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी – श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून भूस्थिर उपग्रह प्रक्षेपकाच्या (जीएसएलव्ही एफ 14) साह्याने ‘इन्सॅट-3 डीएस’चे प्रक्षेपण होईल.
● हवामानशास्त्रीय निरीक्षणांसोबत जमीन आणि समुद्राच्या पृष्ठभागाच्या नोंदी घेण्याचे काम ‘इन्सेंट-3 डीएस’ करणार आहे.
● आपत्ती व्यवस्थापनासाठीही या उपग्रहाची मोठी मदत होईल.
● भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी), नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग (एनसीएमआरडब्ल्यूएफ), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मीटीओरोलॉजी (आयआयटीएम), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन व टेक्नॉलॉजी (एनआयओटी), इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फर्मेशन सर्व्हिसेस (इनकॉईस) आदी संस्था ‘इन्सॅट-3’डीएस कडून मिळणाऱ्या नोंदींचा वापर त्यांच्या संशोधनासाठी किंवा सुविधांसाठी करणार आहे.
असा आहे ‘इन्सेंट-3 डीएस’…
● वजन : 2275 किलो
● कक्षा : भूस्थिर वर्तुळाकार (पृथ्वीपासून 36 हजार किलोमीटर)
● कार्य : जमीन, समुद्राचे चित्रण,वातावरणाच्या नोंदी, आपत्ती व्यवस्थापन आणि जमिनीवरील हवामानशास्त्रीय नोंदींचे आदान प्रदान
● वैज्ञानिक उपकरणे : सहा चॅनलचा इमेजर, हवामानशास्त्रीय नोंदी घेणारा 19 चॅनेलचा साउंडर, जमिनीवरील नोंदींसाठी डेटा रिले ट्रान्सपाँडर, आपत्तीच्या स्थितीत शोध आणि सुटकेसाठीचा ट्रान्सपाँडर
● उड्डाण : ‘जीएसएलव्ही’चे 16 वे उड्डाण