जागतिक मृदा दिन
- जागतिक मृदा दिवस दरवर्षी 5 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
- मातीचे संवर्धन, महत्त्व आणि शाश्वत वापर याबाबत जागरूकता वाढवणे हा त्यामागचा उद्देश आहे.
- माती ही पृथ्वीवरील जीवनाचा आधार आहे, कारण ती अन्न सुरक्षा, जैवविविधता आणि पर्यावरण संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र, मातीची धूप, प्रदूषण, धूप यासारख्या समस्यांमुळे तिची गुणवत्ता आणि उत्पादकता कमी होत आहे.
इतिहास:
- थायलंडचा राजा भूमिबोल अदुल्यादेज यांच्या पुढाकाराने जागतिक मृदा दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
- 2002 मध्ये, आंतरराष्ट्रीय मृदा विज्ञान संघाने तो साजरा करण्याचा प्रस्ताव दिला.
- 2013 मध्ये, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने त्याला अधिकृत मान्यता दिली आणि राजा भूमिबोलचा वाढदिवस 5 डिसेंबर रोजी साजरा करण्याचे घोषित केले.
- हा दिवस मातीचे महत्त्व समजून घेण्यासाठी आणि त्याच्या संवर्धनात सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा देतो.
- ही केवळ शेतकऱ्यांची जबाबदारी नाही तर मातीची काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
- थीम: जमिनीची काळजी घेणे: मोजमाप, निरीक्षण, व्यवस्थापित करा”
कुमार महाराष्ट्र केसरी विक्रम पारखी यांचा मृत्यू
- जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याने कुमार महाराष्ट्र केसरी असणारे शिवाजीराव पारखी (वय ३०) यांचा जागेवरच मृत्यू झाला.
- मुळशीतील माण गावचे रहिवासी असलेल्या विक्रम पारखी यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित ‘महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2014’ मध्ये अजिंक्यपद मिळवले.
- विक्रम यांनी अनेक राष्ट्रीय पदके आणि किताब मिळवले आहेत.
- आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता.
- झारखंड राज्याची राजधानी रांची येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी बकांस्य पदक मिळवले होते.
- मुळशीतील माले केसरी किताब आणि गदाही त्यांनी मिळवली होती. ‘हिंदकेसरी’ पैलवान अमोल बुचडे यांच्याशी त्याचे गुरू-शिष्याचे नाते होते.
इस्त्राईलविरोधात भारताचे मतदान
- संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) आमसभेत इस्त्राईलविरोधात आणलेल्या प्रस्तावाच्या बाजूने भारताने मतदान केले.
- हा प्रस्ताव सेनेगलने दाखल केला.
- इस्त्राईलने 1967 पासून पूर्व जेरुसलेमसह पॅलेस्टाईनवर घेतलेला ताबा सोडावा, अशी मागणी या प्रस्तावात केली होती.
- तसेच पश्चिम आशियातील या प्रदेशात दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.
- प्रस्तावावर 193 सदस्य देशांपैकी 157 देशांनी इस्त्राईलविरोधात मतदान केले.
- केवळ 8 देशांनी इस्राईल च्या बाजूने मतदान केले. तर काहींनी मतदानात भाग घेतला नाही.
‘एनएएफआयएस‘ प्रकल्प
- नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) ने नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम (एनएएफआयएस) प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली आहे.
- या प्रणालीमुळे सर्व जिल्ह्यांतील पोलीस आयुक्तालये, राज्य फिंगरप्रिंट ब्युरो, सेंट्रल फिंगरप्रिंट ब्युरो आणि केंद्रीय कायदा अंमलबजावणी एजन्सींना गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे उपलब्ध असलेले राष्ट्रीय भांडार स्थापन करण्यासाठी साधनसामग्री मिळाली आहे.
- आता बोटांचे ठसे ओळखणाऱ्या सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रणाली एनएएफआयएससह एकत्रित करण्यात आल्या आहेत.
- एनएएफआयएसच्या अंमलबजावणीमुळे 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत गुन्हेगारांच्या बोटांच्या ठशांच्या 06 कोटी नोंदी असलेले राष्ट्रीय भांडार तयार झाले आहे आणि हा संग्रह सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील अधिकृत वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.
- घटनास्थळी सापडलेल्या हातांच्या बोटांच्या ठशांना एनएएफआयएस संग्रहात असलेल्या बोटांच्या ठशांशी पडताळून पाहून गुन्यांच्या प्रभावी आणि झटपट तपासाला मदत करून देशभरातील गुंतागुंतीची प्रकरणे सोडवण्यात एनएएफआयएस महत्त्वाची भूमिका बजावली आहे.