‘इस्रो‘कडून व्हर्टिकल मिक्सर‘ ची निर्मिती
- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) सुमारे दहा टन इंधन मिश्रणाचे व्हर्टिकल प्लॅनेटरी मिक्सर तयार केले आहे, ज्याचा उपयोग सॉलिड मोटारसाठी होतो.
- हा मिक्सर भारतीय अवकाश वाहतूक प्रणालीसाठी महत्त्वपूर्ण आहे.
- सॉलिड मोटार विभागातील वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्र आणि केंद्रीय उत्पादन तंत्रज्ञान संस्था (सीएमटीआय) बंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने या व्हर्टिकल प्लॅनेटरी मिक्सरची निर्मिती करण्यात आली.
- ‘आत्मनिर्भर भारत’ या धोरणाच्या अनुषंगाने तयार केलेला हा मिक्सर जगातील सर्वांत मोठ्या घन इंधनासाठीच्या मिक्सरपैकी एक आहे .
वैशिष्ट्ये:
- वजन – 150 टन
- रुंदी – 3.3 मी.
- लांबी – 5.4 मी.
- उंची – 8.7 मी.