- भारतीयअवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ‘स्पेस डॉकिंग’ या अतिशय महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा प्रयोग हाती घेतला आहे. तो यशस्वी झाला, तर अमेरिका, चीन, रशिया या देशांच्या रांगेत भारताला स्थान मिळेल.
- 7 जानेवारीच्याआसपास या प्रयोगाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
- ‘पीएसएलव्हीसी 60 स्पाडेक्स’ मोहीम यशस्वी झाल्याची माहिती मोहिमेचे संचालक एम. जयकुमार यांनी दिली.
- रॉकेटने475 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत उपग्रहांना यशस्वीपणे नेले.
- पंधरामिनिटांच्या उड्डाणानंतर उपग्रहे नियोजित कक्षेत पोहोचली.
- स्पाडेक्सउपग्रह एकामागोमाग एक कक्षेत गेले. काही काळानंतर दोन्ही उपग्रह एकमेकांपासून अधिक अंतरावर असतील. त्यानंतर ‘स्पेस डॉकिंग’चा प्रयोग सुरू होईल.
- हीप्रक्रिया पुढील आठवड्यात होण्याची अपेक्षा आहे.
- हेतंत्रज्ञान भारताच्या चांद्र मोहिमेसाठीदेखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- ‘चांद्रयान-4’ मोहिमेच्यामाध्यमातून चंद्रावरील मातीचे नमुने आणले जाणार असून, भारतीय अवकाश स्थानकाच्या उभारणीमध्येदेखील त्याची मदत होणार आहे. जेव्हा मोहिमेची समान उद्दिष्टे गाठायची असतात, तेव्हा एकाच वेळी अनेक रॉकेट प्रक्षेपित करावे लागतात. अशा स्थितीमध्ये स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान हे महत्त्वपूर्ण ठरते.
- ‘इस्रो’ने2035 पर्यंत स्वतःचे अवकाश केंद्र उभारण्याचे निश्चित केले असून त्यादृष्टीने टाकण्यात आलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जाते.
- यादेशांकडेच अवकाशामध्ये दोन वेगवेगळी अवकाश याने अथवा उपग्रहे डॉक (जोडणे) आणि अनडॉक करण्याची (वेगळी करणे) क्षमता आहे. यंदाची ‘इस्रो’ची ही शेवटची अवकाश मोहीम होती.
- यायशामुळे भविष्यातील असंख्य मोहिमांना गती मिळणार असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. तब्बल4मीटर उंचीच्या रॉकेटमधून ‘अ’ आणि ‘ब’
- हीदोन आवकाश याने प्रेक्षेपित करण्यात आली होती या अवकाशयानांचे वजन हे प्रत्येकी 220kg एवढे असून त्यांचा स्पेस डॉकिंग उपग्रह सेवा आणि अन्य ग्रहावरील मोहिमांसाठी वापर करता येईल
लोकसभा निवडणुकीत महिलांचे सर्वाधिक मतदान
- एप्रिल-मेमहिन्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुरुषांपेक्षा अधिक महिलांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सांख्यिकी अहवालाद्वारे दिली.
- लोकसभानिवडणुकीत64 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी 65.55 टक्के पुरुष तर 65.78 टक्के महिलांनी मतदान केले.
प्रमुख आकडेवारी
- 13 हजारनोंदणीकृत तृतीयपंथी मतदारांनी (27.09 टक्के) मतदानाचा हक्क बजावला.
- जवळपास43 लाख मतदारांनी टपाली मतदानाचा वापर केला.
- आसाममधीलधुब्री लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक30 टक्के मतदान झाले, तर जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमध्ये सर्वात कमी 38.70 टक्के मतदान झाले.
- 11 मतदारसंघांमध्ये50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले.
- नोटाया पर्यायाला 63,71,839 म्हणजेच99टक्के मते मिळाली.