- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने(डीआरडीओ) 9 मे, 2024 रोजी नवी दिल्लीत ‘पायाभूत सुविधांच्या विकासात उदयोन्मुख तंत्रज्ञान’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद आणि उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले
- या दोन दिवसीय कार्यक्रमात डीआरडीओसह संरक्षण दले, शैक्षणिक संस्था, उद्योग सहभागी झाले आहेत.
- उद्देश : परस्परांमध्ये संवाद निर्माण करणे, ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि ‘पायाभूत सुविधांच्या विकासातील उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि संधींचा फायदा घेण्यासाठी, आत्मनिर्भर भारत साकारण्यासाठी नाविन्यपूर्ण दृष्टीकोनाची चाचपणी करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.