● महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने यापुढे दरवर्षी महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर उद्योगरत्न पुरस्कार देऊन उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान केला जाणार आहे.
● पहिल्या उद्योगरत्न पुरस्कारासाठी सुप्रसिद्ध उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांची निवड करण्यात आली.
इतर पुरस्कार:
● सीरम इन्स्टिट्यूट चे आदर पुनावाला यांना ‘उद्योगमित्र’, किर्लोस्कर उद्योग समूहाच्या संचालिका गौरी किर्लोस्कर यांना ‘महिला उद्योजक’ तर नाशिकच्या फार्मर प्रोड्युसर कंपनीची ‘विलास शिंदे’ यांना मराठी उद्योजक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
● उद्योगरत्न पुरस्कारासाठी 25 लाख रुपये रोख सन्मानचिन्ह मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
● उद्योगमित्र या पुरस्कारासाठी 15 लाख रुपये रोख मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे स्वरूप असून महिला उद्योजक आणि मराठी उद्योजक यांच्या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे.
● 20 ऑगस्ट रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.


