- सरहद संस्थेतर्फे इतिहासाच्या ज्येष्ठ अभ्यासक- संशोधक आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची कन्या डॉ. उपिंदर सिंग यांना 2024 चा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
- एक लाख एक हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
- महाराष्ट्र आणि पंजाबचे नाते दृढ करणाऱ्या, तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्तृत्व गाजवलेल्या केवळ पंजाबी व्यक्तीस प्रतिवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.