● भारताचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने कौंटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पाच सामन्यांसह एकदिवसीय चषकासाठी यॉर्कशायर संघाशी करार केला आहे.
● यॉर्कशायर संघ जुलैमध्ये सरेविरुद्ध कौंटी सामना खेळणार आहे. त्याआधी ऋतुराज संघाशी जोडला जाईल आणि हंगामाच्या अखेरपर्यंत संघाबरोबर असेल.
चौथा भारतीय
● यॉर्कशायर कौंटी संघाकडून खेळणारा ऋतुराज हा चौथा भारतीय खेळाडू ठरेल. याआधी सचिन तेंडुलकर (१९९२), युवराज सिंग (२००३) आणि चेतेश्वर पुजारा (२०१५, २०१८) या संघांकडून खेळले आहेत.