एआय कौशल्यांत भारत अव्वल
- कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञान क्षेत्रात जगभरात मोठे बदल होत असतानाच, भारतातही ‘एआय’ला बळ देण्यासाठी सरकारी स्तरावर मोठी झेप घेण्यात आली आहे.
- ‘एआय’ ही केवळ बलाढ्य कंपन्यांची मक्तेदारी राहू नये, यासाठी विद्यार्थी, नवोद्योजकांना बळ देण्यात येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने, पायाभूत सुविधा विस्तारण्यात येत आहेत.
- ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स (जीपीयू) आणि संशोधनाशी संबंधित सोयीसुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
‘एआय‘ प्रचार–प्रसारात भारत अव्वल
- अलीकडेच प्रकाशित झालेल्या स्टॅनफोर्ड एआय निर्देशांकानुसार, कृत्रिम प्रज्ञाविषयक कौशल्यांचा प्रचार-प्रसार आणि उपलब्धतेबाबत जागतिक पातळीवर भारत पहिल्या स्थानावर आहे.
- भारताला8 गुण तर अमेरिकेला 2.2 गुण जर्मनीला 1.9 गुण मिळाले
- आजमितीला जगभरातील ‘एआय’ प्रतिभांपैकी 16टक्के प्रतिभा भारतात वसलेली आहे.
- जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम ‘एआय’ प्रतिभा केंद्रांमध्ये भारत सर्वोच्च पाच देशांमध्ये.
- व्हीलबॉक्स या संस्थेचा ‘इंडिया स्किल्स अहवाल’. भारतातील ‘एआय’ उद्योग 2025 पर्यंत8 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचणार
इंडिया एआय मिशनची स्थापना
- केंद्र सरकारने 2024 मध्ये इंडिया एआय मिशनला मंजुरी दिली. यासाठी 10 हजार 300 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली
- प्रत्येक टप्प्यावर उच्च कार्यक्षमतेच्या सामान्य संगणकीय सुविधा उपलब्ध करणार
- भारतीय भाषांमध्ये स्वदेशी ‘एआय’ अॅप्लिकेशन विकसित करण्यासाठी प्रयत्न
- ‘एआय’ तंत्रज्ञान प्रारूपाच्या प्रारंभालाच 10 हजार जीपीयू कम्प्युटिंग सुविधेची जोड.
- लवकरच उर्वरित आठ हजार 693जीपीयू जोडले जाणार
‘एआय‘ सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना
- नवी दिल्लीत आरोग्य, शेती, शाश्वत शहरांवर भर असलेल्या तीन ‘एआय सेंटर्स ऑफ एक्सलन्स’ची स्थापना करणार
- त्यासाठी 2025च्या अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद
- याद्वारे तरुणांना उद्योगासंबंधी प्रशिक्षण, मेक फॉर इंडिया, मेक फॉर द वर्ल्डला पाठबळ