ऍडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडियाच्या पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 2023 – 24 या वर्षासाठी प्रशांत कुमार यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. ते ग्रुप एम मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे दक्षिण आशियाई विभागाचे मुख्याधिकारी आहेत. हवास इंडियाचे समूह मुख्याधिकारी राणा भरवा यांची असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सहमतीने निवड करण्यात आली.


