Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

एक्सपोसॅट उपग्रहाचे आज प्रेक्षपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) 1 जानेवारी 2024 रोजी नवीन वर्षांचे स्वागत पहिल्या ‘एक्स-रे पोलरिमीटर उपग्रहा’च्या (एक्सपोसॅट) प्रक्षेपणाने करणार आहे. त्यासाठी संबंधित सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
या मोहिमेद्वारे कृष्णविवरांसारख्या (ब्लॅक होल) खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमधील गगनयान चाचणी वाहन ‘डी 1 मिशन’च्या यशानंतर हे प्रक्षेपण करण्यात येत आहे.

अधिक माहिती
• या मोहिमेचे आयुष्य सुमारे पाच वर्षांचे असेल.
• ही भारताची पहिली समर्पित ‘पोलरिमीटर’ मोहीम आहे. त्यामुळे कृष्णविवरांच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यास मदत होईल.
• ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक (पीएसएलव्ही) -‘सी ५८’ आपल्या साठाव्या मोहिमेत प्रमुख अभ्यास उपग्रह ‘एक्सपोसॅट’सह दहा अन्य उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.
• हे उपग्रह पृथ्वीच्या निम्न कक्षेत सोडले जातील.
• चेन्नईपासून पूर्व भागात सुमारे 135 किलोमीटरवर असलेल्या अवकाश केंद्रातून नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी होत असलेल्या प्रक्षेपणासाठी 25 तासांची उलटगणती सुरू झाली आहे.
• इस्रो’च्या मते, अवकाश आधारित ध्रुवीकरण मापनांद्वारे खगोलीय स्त्रोतांकडून क्ष किरण उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा ‘इस्रो’चा पहिला समर्पित वैज्ञानिक अभ्यास उपग्रह आहे.
• ‘इस्रो’व्यतिरिक्त, अमेरिकन संस्था ‘नासा’ने डिसेंबर 2021 मध्ये ‘सुपरनोव्हा’ स्फोटाचे अवशेष, कृष्णविवरांमधून उत्सर्जित होणाऱ्या कणांचे प्रवाह आणि इतर खगोलीय घटनांवर असाच अभ्यास केला होता.

मोहिमेची वैशिष्ट्ये
• कृष्ण विवरांसारख्या (ब्लॅक होल) खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न
• उपग्रह प्रक्षेपक प्रमुख अभ्यास उपग्रह ‘एक्सपोसॅट’सह दहा अन्य उपग्रह प्रक्षेपित करणार
• खगोलीय स्त्रोतांकडून होणाऱ्या क्ष किरण उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा ‘इस्रो’चा पहिला समर्पित वैज्ञानिक अभ्यास उपग्रह
• श्रीहरिकोटा येथे इस्रोच्या एक्स-रे पोलरीमीटर उपग्रह (एक्स-पीओसॅट) वाहून नेणाऱ्या पीएसएलव्ही-सी५८ या प्रक्षेपकाच्या उड्डाणाची तयारी सुरू आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *