Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘एक्सपोसॅट’ चे यशस्वी प्रक्षेपण

आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून इस्रोच्या ‘पीएसएलव्ही- सी58’द्वारे एक्सपोसॅट उपग्रहासह दहा अभ्यास उपकरणे यशस्वीरित्या प्रेक्षेपित करण्यात आली. या उपग्रहाद्वारे कृष्णविवरांचा अभ्यास केला जाणार आहे
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी (1 जानेवारी) आपल्या मोहिमांचा नवा अध्याय सुरू करत नवीन वर्षांचे उत्साहात स्वागत केले.

अधिक माहिती
• ‘इस्रो’ने पहिल्या ‘एक्स-रे पोलरिमीटर उपग्रहा’चे (एक्सपोसॅट) यशस्वी प्रक्षेपण केले.
• या उपग्रहाद्वारे कृष्णविवरांचा अभ्यास करून त्यामागचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
• या मोहिमेद्वारे अशा खगोलीय घटकांचा अभ्यास करणारा भारत हा अमेरिकेनंतरचा दुसराच देश ठरणार आहे.
• चेन्नईपासून सुमारे 135 किलोमीटरवरील अवकाश केंद्रातून ‘पीएसएलव्ही’चे सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी अवकाश केंद्रातून प्रक्षेपण झाले.
• प्रक्षेपणासाठीची 25 तासांची उलटगणती संपल्यानंतर, 44.4 मीटर लांबीचा प्रक्षेपकाने उड्डाण केले.
• इस्रो’ने एप्रिल 2023 मध्ये ‘पीओएएम-२’चा वापर करून असाच एक वैज्ञानिक प्रयोग केला होता.
• या मोहिमेत ‘इस्रो’च्या अतिशय भरवशाचा ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाने (पीएसएलव्ही) -‘सी ५८’ आपल्या साठाव्या मोहिमेत प्रमुख अभ्यास उपग्रह ‘एक्सपोसॅट’सह अन्य अवकाशीय अभ्यासाची उपकरणे (पेलोड) अवकाशात प्रक्षेपित केली.
• एका उपकरणाची निर्मिती महिलांनी केली आहे.
• प्रक्षेपकाने प्रमुख उपग्रह ‘एक्सपोसॅट’ 650 किलोमीटरवरील पृथ्वीच्या निम्न कक्षेत प्रस्थापित केले.
• नंतर शास्त्रज्ञांनी ‘पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपरिमेंटल मॉडय़ूल’सह (पीओएएम) प्रयोग करण्यासाठी उपग्रहाची कक्षा 350 किलोमीटपर्यंत घटवली.
• या बिंदूपासून ‘पीएसएलव्ही’च्या चौथ्या टप्प्याची कक्षा निम्न कक्षेत बदलेल.
• जिथे ‘पीओएएम’ नावाचा ‘पीएसएलव्ही’चा वरचा टप्पा ‘पेलोड’सह प्रयोग करेल आणि त्यासाठी काही वेळ लागेल.
• ‘एक्सपोसॅट’ खगोलीय क्ष-किरण स्त्रोताचे रहस्य उलगडण्यात आणि कृष्णविवरांच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यात मदत करेल. असा अभ्यास करणारा इस्रोचा हा पहिलाच समर्पित वैज्ञानिक उपग्रह आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *