Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

एक जिल्हा – एक उत्पादनात महाराष्ट्राला सुवर्ण Maharashtra wins gold in One District – One Product

Maharashtra wins gold in One District - One Product

● केंद्र सरकारच्या ‘एक जिल्हा, एक उत्पादन-२०२४’ (ओडीओपी) उपक्रमांतर्गत महाराष्ट्राने ‘अ’-श्रेणीमध्ये सुवर्णपदक पटकावले असून द्राक्ष व मनुक्यांसाठी नाशिक जिल्ह्याला विशेष उल्लेखनीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
● जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये हा पुरस्कार स्वीकारला.
● राष्ट्रीयस्तरावरील या पुरस्कार वितरण समारंभाला केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद आदी उपस्थित होते.
● राज्यातर्फे उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी हा मान स्वीकारला आहे.

राष्ट्रीयस्तरावर वर्चस्व

● महाराष्ट्राने उत्पादनांची नाविन्यपूर्णता, उच्च दर्जा आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रीयस्तरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
● ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना प्रोत्साहन दिले जात असल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.
● जागतिक बाजारपेठेतही या उत्पादनांचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न होत आहे.

तीन गटांमध्ये विभागणी

● या पुरस्कारांमध्ये जिल्हा, राज्य आणि परदेशातील भारतीय दूतावास अशा तीन गटांत विभागणी करून सन्मान प्रदान करण्यात आले.
● नाशिकच्या द्राक्षांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान अधिक भक्कम केले असून, यामुळे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रातील योगदानाला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे.

राज्याला मिळालेले पुरस्कार

1)नाशिक – द्राक्षे व मनुका- कृषी क्षेत्रातील अ श्रेणी विशेष उल्लेख पुरस्कार
2)रत्नागिरी -हापूस आंबा -सुवर्णपदक
3)नागपूर-संत्रा-रौप्यपदक
4)अमरावती-मंदारिन संत्रा-कांस्यपदक
5)अकोला -कापूस जिनिंग व प्रेसिंग -गैर-कृषी क्षेत्रात विशेष उल्लेख पुरस्कार

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *