एन टी पी सी रिन्युएबल एनर्जी लिमिटेड (एन टी पी सी-आर ई एल ) च्या राजस्थानमधील छत्तरगड येथील पहिल्या सौर प्रकल्पाने 21 फेब्रुवारी 2024 रोजी 70 मेगावॅट क्षमतेचे व्यावसायिक कार्य सुरू केल्याचे घोषित केले आहे. यामुळे आता, एनटीपीसी समूहाची स्थापित उर्जा क्षमता 73,958 मेगावॉटवर पोहोचली आहे.
अधिक माहिती
● सध्या, एन टी पी सी-आर ई एल चे 17 प्रकल्प कार्यान्वित आहेत, त्यांची एकूण क्षमता 6,000 मेगावॉट पेक्षा जास्त आहे. याशिवाय, एनटीपीसी समूहाची एकूण अक्षय ऊर्जा परिचालन क्षमता 3,448 मेगावॅट इतकी आहे.
● छत्तरगढ सौर प्रकल्पाची निर्धारित पूर्ण क्षमता 150 मेगावॅट इतकी असून तो मार्च 2024 पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित आहे.
● सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत ही क्षमता संपादित करण्यात आली असून राजस्थानला या प्रकल्पाचा लाभ होणार आहे.
● दरवर्षी 370 दशलक्ष युनिट ऊर्जा निर्मिती होईल या दृष्टीने या प्रकल्पाची रचना करण्यात आली आहे, इतकी ऊर्जा 60,000 कुटुंबाच्या ऊर्जेच्या आवश्यकतेएवढी आहे.
● तसेच यामुळे दरवर्षी 3 लाख टन इतके कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि 1,000 दशलक्ष मेट्रिक टन प्रतिवर्ष पाण्याची बचत होईल, जे पाणी एका वर्षात 5,000 हुन अधिक कुटुंबांसाठी पुरेसे आहे.