आयएनएस गरुड, कोची येथे 6 मार्च 2024 रोजी भारतीय नौदलाच्या ताफ्यात, एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती ) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षण विषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे.
अधिक माहिती
• भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, ‘आयएनएएस 334’ या या नावाने कार्यरत होणार आहे.
• 24 हेलिकॉप्टरसाठी,अमेरिकी सरकारसोबत फेब्रुवारी 2020 मध्ये एफएमएस करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या त्याचा ही हेलिकॉप्टर भाग आहेत.
• सीहॉक्सच्या समावेशाने, भारतीय नौदलाच्या सागरी सामर्थ्यात लक्षणीय वाढ होणार आहे.
• अँटी-सबमरीन वॉरफेअर (ASW) म्हणजे पाणबुडी रोधी युद्ध, अँटी-सर्फेस वॉरफेअर (ASuW) म्हणजे पाण्यातून केलेले जमिनीवरील युद्ध, शोध आणि बचाव कार्य (सर्च अँड रिलीफ-SAR), मेडिकल इव्हॅक्युएशन (MEDEVAC) म्हणजे अत्यावश्यक परिस्थितीत रुग्णांची केली जाणारी वाहतूक आणि व्हर्टिकल रिप्लेनिशमेंट (VERTREP) म्हणजे समुद्रात जहाजांना हवाई मार्गाने केला जाणारा पुरवठा, या दृष्टीने या हेलिकॉप्टरची रचना केलेली आहे.
• भारतीय वातावरणासाठी योग्यतेच्या अनुषंगाने, या हेलिकॉप्टर्सची कसून चाचणी घेण्यात आली आहे आणि ती पूर्णपणे साजेशी आहेत.
• भारतीय नौदलाच्या सागरी सुरक्षा गरजा पुरवण्याच्या दृष्टीने, आधुनिक शस्त्रे, सेन्सर्स आणि हवाई इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी (एव्हियोनिक्स सूट) परिपूर्ण सीहॉक्स आदर्श ठरतात. यामुळे पारंपरिक तसेच अचानक उद्भवणाऱ्या धोक्यांसाठी वाढीव क्षमता मिळते.
• एमएच 60 आर हेलिकॉप्टर्स भारताची सागरी क्षमता वाढवतील, तसेच नौदलाच्या कार्यकक्षेचा विस्तार करतील आणि सागरी क्षेत्राच्या विशाल परिघात, नौदलाच्या विविधांगी सातत्यपूर्ण कार्यवाहीला पाठबळ देतील.
• हिंद महासागर क्षेत्रात सीहॉकची तैनाती, भारतीय नौदलाचे सागरी अस्तित्व मजबूत करेल, संभाव्य धोके दूर करेल आणि या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण प्रदेशात सुरक्षित आणि निर्धोक वातावरण सुनिश्चित करेल.
• सीहॉक्सचा ताफ्यात समावेश हे भारतीय नौदलाचे सागरी सुरक्षा मजबूत करण्याप्रति दृढ समर्पण अधोरेखित करते.
• तसेच या क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास सुनिश्चित करण्याच्या भारत सरकारच्या दूरदर्शी ध्येयाला हे अनुरूप आहे.