Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘एमसीसी’कडून सचिनला मानद सदस्यत्व

'एमसीसी'कडून सचिनला मानद सदस्यत्व

सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम

  • शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स आणि कृषी पंप असा संपूर्ण संच देण्याच्यामागेल त्याला सौर कृषी पंपयोजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले आहे
  • या योजनेच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी 844 पंप राज्यात बसविण्यात आले
  • राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. राज्यात साडेदहा लाख सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दिष्टये ठेवले आहे.

सर्वाधिक आकडेवारी डिसेंबर महिन्यातील

  • राज्यात महावितरणच्या माध्यमातून डिसेंबर महिन्यात 21 हजार 951 सौर कृषी पंप बसविण्यात आले, अर्थात दररोज सरासरी 844 पंप बसविण्यात आले.
  • ही आतापर्यंतची कोणत्याही महिन्यातील सर्वाधिक सरासरी आहे
  • सन 2015 ते 2023 पर्यंत विविध योजनेत 1 लाख 80 हजार सौर पंप बसविण्यात आले होते
  • तथापि, यावर्षी मार्च 2024 पासून आतापर्यंत फक्त आठ महिन्यांच्या कालावधीत राज्यात 1 लाख 58 हजार सौर पंप बसविण्यात आले आहेत.

ओसामु सुझुकी यांचे निधन

  • भारतीय मोटर वाहन उद्योगाला नवीन दिशा देणाऱ्या आणि मध्यमर्गीयांच्या चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ओसामु सुझुकी यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले.
  • त्यांना लिम्फोमा नावाच्या आजाराने ग्रासले होते
  • ओसामू सुझुकी हे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे संचालक आणि मानद अध्यक्ष होते.
  • 1981 मध्ये मारुती उद्योग लिमिटेडबरोबर संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी तत्कालीन भारत सरकारबरोबर  भागीदारी करण्याचा धाडसी निर्णय घेणारे व्यक्तिमत्व अशी सुझुकी यांची ओळख आहे .
  • तत्कालीन काळात परवाना व्यवस्थेअंतर्गत भारत ही एक बंद अर्थव्यवस्था होती तेव्हा सुझुकी यांना देशातील मोटर वाहन उद्योगाला चालना तथा नवीन दिशा देणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते.
  • 2007 मध्ये सरकारने सुझुकी मोटर कॉर्पोरेशन मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मारुती उद्योग लिमिटेड नंतर मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड म्हणून नावारुपाला आली.
  • सुझुकी यांची दुरदृष्टी, जोखीम घेण्याची इच्छा, भारताबद्दल असलेले प्रेम, आपुलकी आणि एक शिक्षक म्हणून त्यांच्या अफाट क्षमतांशिवाय भारतीय मोटर वाहन उद्योगाने भरारी घेणे अशक्य होते, अशा भावना मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आर. सी. भार्गव यांनी व्यक्त केल्या
  • सुझुकीच्या वाहनांच्या जगभर विस्ताराचे श्रेय ओसामु यांना दिले जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच सुझुकीच्या छोट्या कार आणि मोटारसायकलींना जगभरात एक वेगळी ओळख मिळाली.

जर्मनीची संसद विसर्जित

  • जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्झ यांच्या नेतृत्वातील सरकारने विश्वासमत गमावल्यानंतर राष्ट्राध्यक्ष फ्रैंक वॉल्टर स्टीनमियर यांनी संसद विसर्जित केली असून 23 फेब्रुवारी रोजी निवडणुका घेण्याचे आदेश जारी केले आहेत
  • शोल्झ यांनी 16 डिसेंबर रोजी विश्वासमत गमावले होते आणि अल्पमतातील सरकारचे नेतृत्व करीत होते
  • शोल्झ यांच्या तीन पक्षांची युती असलेल्या सरकारने अर्थव्यवस्था पुनर्जीवित करण्याच्या पद्धतीवर झालेल्या वादातून अर्थमंत्र्यांना बडतर्फ केल्यानंतर सरकार संकटात आले होते. त्यानंतर अनेक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संसदीय निवडणुका सात महिन्यांपूर्वी 23 फेब्रुवारी रोजी घेण्यावर एकमत केले.
  • दरम्यान, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या घटनेनुसार संसद विसर्जित करण्याची परवानगी नसल्याने याबाबतचा निर्णय स्टीनमियर यांच्यावर अवलंबून होता
  • हा निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे 21 दिवसांचा कालावधी होता
  • संसद विसर्जित केल्यानंतर 60 दिवसांच्या आत देशात निवडणुका होणे आवश्यक आहे.

चौथी वेळ

  • दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जर्मनीच्या घटनेनुसार संसद विसर्जित करण्याची ही चौथी वेळ आहे.
  • हे 1972 मध्ये चान्सलर विली ब्रँडट, 1982 मध्ये हेल्मुट कोहल आणि 2005 मध्ये गेरहार्ड श्रोडर यांच्या नेतृत्वाखालीलसरकारने विश्वासमत गमावल्यानंतर संसद विसर्जित करण्यात आली होती.

एमसीसीकडून सचिनला मानद सदस्यत्व

  • भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला प्रतिष्ठेच्या मेलबर्न क्रिकेट क्लबकडून (एमसीसी) मानद सदस्यत्व देण्यात आले आहे.
  • ऑस्ट्रेलियातील सर्वांत जुन्या क्लबपैकी एक असलेल्याएमसीसीची स्थापना 1838 मध्ये झाली
  • मेलबर्न क्रिकेट मैदानाचे (एमसीजी) व्यवस्थापन आणि विकास याची जबाबदारी या क्लबवर आहे.
  • भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरने क्लबचे मानद सदस्यत्व स्वीकारले आहे.
  • मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारताकडून सर्वाधिक कसोटी धावा सचिनच्याच नावे आहेत. त्याने या मैदानावर 5 – कसोटी सामन्यांत 44.90च्या सरासरीने 449 धावा केल्या आहेत.

 प्रताप जाधवजीवनगौरवने सन्मानित

  • भारतातमधील सायकलींग क्षेत्रातील अजोड संघटनात्मक योगदानाबद्दल महाराष्ट्राचे माजी राष्ट्रीय सायकलपट्टू आणि संघटक प्रताप जाधव यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
  • नवी दिल्ली येथे झालेल्या एका समारंभात आशियाई सायकलींग संयुक्त महासंघाचे महासचिव ओंकार सिंग तसेच नवी दिल्लीचे प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक आणि उद्योगपती गुरमीत सिंग यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.
  • भारतामध्ये सायकलिंग खेळासाठी 25 वर्षाहून अधिक काळ प्रेरणादायी योगदान देणाऱ्या व्यक्तीस या पुरस्काराने गौरविण्यात येते.
  • प्रताप जाधव यांनी 1977 ते 1987 दरम्यान खेळाडू म्हणून आपली कारकीर्द गाजवली.
  • यात राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सहा वेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
  • दोन वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकण्याची कामगिरी केली.
  • जाधव यांनी दोन वेळा राज्य रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
  • त्यांनी भारतामधील सर्वांत जुन्या आणि खडतर समजल्या जाणाऱ्या मुंबई–  पुणे सायकल स्पर्धेत सहा वेळा सहभाग घेतला रौप्य महोत्सवी स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले.
  • 1993 पासून राज्य तसेच राष्ट्रीय सायकलींग संघटनेत विविध पदावर त्यांनी काम केले आहे.
  • जाधव सध्या भारतीय सायकलिंग महासंघाचे उपाध्यक्ष असून चार वर्षे तेसीएफआयचे कोषाध्यक्षही होते
  • संघटक म्हणून आपल्या 40 वर्षांच्या काळात जाधव यांनी 23 वेळा मुंबईपुणे सायकल स्पर्धा, 15 वेळा एमटीबी, 4 वेळा रोड आणि एकदा ट्रॅक अशा 20 राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा, 10 वेळा राष्ट्रीय शालेय रोड सायकलिंग स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले.
  • भारतात चार दिवसीय स्टेज सायकल स्पर्धा सलग दोन वर्षे आयोजित केली. तसेच सर्वांत लांब पल्ल्याची 250 किमी अंतराची कोल्हापूर-सातारा-  कोल्हापूर एकदिवसीय सायकल स्पर्धा आयोजनाचा विक्रम आजही जाधव यांच्याच नावावर आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *