● ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष एम. आर. श्रीनिवासन यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.
● स्वदेशी अणुऊर्जा कार्यक्रम आखण्यात डॉ श्रीनिवासन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
● अणुऊर्जा विभागाचे (डीएई) सचिव म्हणूनही त्यांनी देशाच्या अणुकार्यक्रमात महत्त्वाचे योगदान दिले होते.
● त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.
● डॉ. श्रीनिवासन सप्टेंबर 1955मध्ये अणुऊर्जा विभागामध्ये रुजू झाले.
● ‘अप्सरा’ या देशाच्या पहिल्या अणुसंशोधन अणुभट्टीच्या उभारणीसाठी डॉ. होमी भाभा यांच्याबरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळाली.
● त्यानंतर 1959 मध्ये देशाच्या पहिल्या अणुऊर्जा केंद्राच्या बांधकामासाठी प्रधान प्रकल्प अभियंते म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
● पुढे 1967 मध्ये त्यांनी मद्रासह अणुऊर्जा केंद्राचे प्रमुख प्रकल्प अभियंता म्हणून जबाबदारी स्वीकारली.
● त्यांनी ‘डीएई’ च्या ऊर्जा प्रकल्प अभियांत्रिकी विभागाचे संचालक, तसेच अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष अशा पदांवर काम केले.
● 1987 मध्ये त्यांची अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.