पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालय यांच्या वतीने पुणे येथे तीन दिवसीय 8 व्या आंतरराष्ट्रीय एशिया इकॉनॉमिक परिषदेचे (डायलॉग) आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन 29 फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
अधिक माहिती
• ‘वाढत्या प्रवाहाच्या युगात भौगोलिक व आर्थिक आव्हाने’ या संकल्पनेवर आधारित ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
• यामध्ये तीन दिवसांच्या विविध 12सत्रांमध्ये 11 देशांमधील 46 तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.
• ही आंतरराष्ट्रीय परिषदेतील सहभागी तज्ज्ञ हे आशिया आणि संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या आर्थिक बाबींवर अभ्यासपूर्ण चर्चा करणार आहेत.
• उद्घाटन सत्रात प्रसिद्ध शास्त्रज्ञ व पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
• जगातील भू-आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि दक्षिण आशियायी राष्ट्रांमधील आर्थिक समन्वय आवश्यक असल्याचे मत विविध देशातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.