छोट्या उपग्रहांची वाढती मागणी लक्षात घेऊन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आपले लघु उपग्रह प्रक्षेपण वाहन एसएसएलव्ही खाजगी उद्योग क्षेत्रांना हस्तांतर करण्याची घोषणा केली.
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी ‘एसआयए’ इंडिया ने आयोजित केलेल्या भारतीय अंतराळ परिषदेत ही माहिती दिली.
पृथ्वीच्या खालील कक्षेत 500 किलोमीटर पर्यंतचे उपग्रह स्थापित करण्याची सेवा मागणीनुसार पुरविण्यासाठी एसएसएलव्ही च्या दोन प्रायोगिक चाचण्या घेतल्या आहेत.
एसएसएलव्ही उद्योगांना हस्तांतरित केले जाईल तसेच वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली जाईल.
इस्रो ने हे मिनी रॉकेट खाजगी क्षेत्राला हस्तांतरित करण्यासाठी बोली लावण्याचा पर्याय निवडला आहे.
एसएसएलव्ही इस्रो ने विकसित केलेले सहावे प्रक्षेपण वाहन आहे
” एसएसएलव्ही” :-
एसएसएलव्ही हे छोटे उपग्रह प्रक्षेपित करणारे इस्रोचे प्रक्षेपण वाहन असून त्याद्वारे 10 ते 100 किलो दरम्यानच्या अतिसूक्ष्म आणि सूक्ष्म उपग्रहांचे प्रक्षेपण केले जाते.
इतर वेळी मोठ्या प्रक्षेपकांबरोबर अशा छोट्या उपग्रहांचे प्रक्षेपण केले जाते मात्र एसएसएलव्ही मुळे छोट्या उपग्रहांच्या प्रक्षेपणाची सोय उपलब्ध झाल्याने त्याची मागणी वाढली आहे.


