Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘एसबीआय’च्या अध्यक्षपदी शेट्टी

  • वित्तसेवा संस्था विभागाने (एफएसबीआय) भारतीय स्टेट बँक या देशातील सर्वांत मोठ्या बँकेच्या अध्यक्षपदी चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची नियुक्ती केली आहे.
  • ते बँकेचे सर्वांत वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक आहेत.
  • विद्यमान अध्यक्ष दिनेशकुमार खारा हे 28 ऑगस्टला सेवानिवृत्त होत आहेत. त्यानंतर शेट्टी हे पदाची जबाबदारी सांभाळतील.
  • शेट्टी यांच्याकडे सध्या आंतरराष्ट्रीय बँकिंग, जागतिक बाजारपेठा आणि तंत्रज्ञानातील बदल या विभागांची जबाबदारी आहे.

SBI ही देशातील सर्वात मोठी बँक

  • स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे.
  • एसबीआयमध्ये सरकारचा92% हिस्सा आहे.
  • त्याची स्थापना 1 जुलै 1955 रोजी झाली.
  • बँकेचे मुख्यालय मुंबईत आहे.
  • एसबीआयच्या 22,405 हून अधिक शाखा आहेत आणि 48 कोटींहून अधिक ग्राहकांचा बाजारातील एक चतुर्थांश हिस्सा आहे.
  • बँक जगातील 29 देशांमध्ये कार्यरत आहे. भारताबाहेर त्याच्या 235 शाखा आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *