● मध्य रेल्वे विभागांतर्गत रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिसांनी एप्रिल आणि मे महिन्यात ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहीम राबवून हरवलेल्या, घरातून पळून आलेल्या आणि अनवधानाने स्थानकात राहिलेल्या 235 बालकांचा शोध घेत त्यांना पालकांपर्यंत सुखरूप पोहोचवले.
● मध्य रेल्वे विभागांतर्गत मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, भुसावळ, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली ही स्थानके असून, या स्थानकांवर नेहमीच गर्दी असते.
● या रेल्वे स्थानकांवर काही बालके भांडण किंवा रागावल्यामुळे घर सोडतात. तसेच ग्रामीण भागातील काही मुले ही शहराच्या आकर्षणापोटी घर सोडून शहरात येतात.
● अशा बालकांसाठी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहीम राबविण्यात आली.
● मध्ये रेल्वे विभागातील ‘आरपीएफ’ विभागाने या मोहिमेंतर्गत चाइल्डलाइन या स्वयंसेवी संस्थेच्या समन्वयातून एप्रिल महिन्यात ११४ आणि मे महिन्यात १२१ अशी एकूण २३५ बालकांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवले.
ऑपरेशन जीवनरक्षक
● प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे रेल्वे स्थानकावर घडणाऱ्या अपघातांमध्ये ‘ऑपरेशन जीवनरक्षक’ अंतर्गत ‘आरपीएफ’ जवानांनी १२ प्रवाशांचा प्राण वाचवला. त्यांपैकी तीन महिला आहेत. मागील वर्षी याच कालावधीत सात जणांचा प्राण वाचविण्यात यश आले होते.