Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

ऑलिम्पियाडमध्ये भारताला चार पदके India wins four medals at the Olympics

India wins four medals at the Olympics

● आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिंपियाडमध्ये (आयसीएचओ) भारताने उल्लेखनीय यश मिळवले.
● या स्पर्धेत सहभागी झालेल्या चार भारतीय विद्यार्थ्यांनी पदके पटकावली असून, राज्यातील देवेश पंकज भय्या या विद्यार्थ्याने सुवर्णपदकावर नाव कोरले.
● 5 ते 14 जुलै 2025 दरम्यान दुबई येथे ही
स्पर्धा झाली.
● हे या स्पर्धेचे ५७ वे वर्ष होते. त्यात भारतीय संघाने दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली.
● त्यात जळगाव येथील देवेश पंकज भय्या आणि हैदराबाद येथील संदीप कुची यांनी सुवर्ण, तर भुवनेश्वर येथील देबदत्त प्रयदर्शी, नवी दिल्ली येथील उज्ज्वल केसरी यांनी रौप्यपदक मिळवले.
● यंदा या स्पर्धेत ९० देशांतील ३५४ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पदक यादीत भारत सहाव्या क्रमांक राहिला.युक्रेन, उझबेकिस्तान, कझाकस्तान आणि इस्रायलसह एकूण पदकतालिकेत भारत सहाव्या स्थानावर राहिला.
● आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या सहभागाचे हे 26 वे वर्ष होते.
● भारतीय संघाला शिक्षणतज्ञांच्या समर्पित पथकाचे मार्गदर्शन लाभले.
● मुंबई येथील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे, प्रा. अंकुश गुप्ता यांनी मुख्य मार्गदर्शक म्हणून काम पाहिले, तर दिल्लीच्या आचार्य नरेंद्र देव महाविद्यालयाच्या प्रा. सीमा गुप्ता या मार्गदर्शक होत्या.
● पुणे येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या डॉ. नीरजा दशपुत्रे आणि पश्चिम बंगालच्या सिंगूर येथील शासकीय सामान्य पदवी महाविद्यालयातील डॉ. अमृत मित्रा हे वैज्ञानिक निरीक्षक होते.
● या आव्हानात्मक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
● स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड आणि प्रशिक्षण होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या माध्यमातून केले जाते.
● गेल्या २६ वर्षांतील सहभागामध्ये ३० टक्के विद्यार्थ्यांनी सुवर्ण, ५३ टक्के विद्यार्थ्यांनी रौप्य आणि १७ टक्के विद्यार्थ्यांनी कांस्यपदके मिळवली आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *