ऑस्कर विजेते अभिनेते जीन हॅकमन यांचे निधन
- प्रसिद्ध अभिनेते हॅकमन यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.
- त्यांनी दोन ऑस्करसह अनेक पुरस्कारांवर स्वतःचे नाव कोरले होते.
- त्यांना एकूण पाच वेळा ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते.
- गेल्या शतकाच्या साठीच्या दशकात सुरू झालेली त्यांची कारकीर्द त्यांनी निवृत्त स्वीकारेपर्यंत सतत बहरलेली राहिली.
- ‘द फ्रेंच कनेक्शन‘ आणि ‘अनफरगिव्हन‘ या दोन चित्रपटांसाठी त्यांना अभिनयासाठी ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
- त्याशिवाय बॉन अँड क्लाईड, यंग फ्रैंकनस्टाइन, सुपरमॅन, द रॉयल टेनेनबॉम्स या चित्रपटांमधील त्यांच्या कामाची प्रशंसा झाली होती.
- नायक, खलनायकासह विनोदी, हलक्याफुलक्या, संवेदनशील, गूढ अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी आपली प्रतिभा सिद्ध केली होती.
- अभिनेत्यांचा बादशहा, करारी स्वभावाचे आणि त्याचवेळी समारंभांमध्ये मिरवण्यास फारसे उत्सुक नसलेले लोकप्रिय व्यक्ती अशी त्यांची ख्याती होती.