Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

ऑस्ट्रेलियन ओपन – 2024

पुरुष एकेरीचे सिनरला विजेतेपद

• 2024 या वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेचे (ऑस्ट्रेलियन ओपन) विजेतेपद पटकावताना इटलीच्या 22 वर्षीय टेनिसपटू यानिक सिनरने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा 3-6, 3-6,6-4,6-3 अशा फरकाने पराभव केला.
• सिनर याने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम जिंकताना धडाकेबाज कामगिरी केली. इटलीच्या पुरुष टेनिसपटूने ग्रँडस्लॅम जिंकण्याची ही गेल्या 48 वर्षांतील पहिलीच वेळ ठरली.
• याआधी 1976 मध्ये अॅड्रियानो पनाटा याने फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आता सिनर याने बाजी मारली आहे.
• यानिक सिनर पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचला व जेतेपद पटकावले.
• ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम जिंकणारा यानिक सिनर हा पहिलाच इटलीचा टेनिसपटू ठरला.
• ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणारा यानिक सिनर हा इटलीचा पाचवा खेळाडू ठरला आहे.
• याआधी इटलीच्या तीन पुरुष व दोन महिला खेळाडूंनी ग्रँडस्लॅमचे जेतेपद पटकावले आहे.

ग्रँडस्लॅम जिंकणारे इटलीचे टेनिसपटू
● निकोला पिट्रॅगेली (पुरूष, फ्रेंच ओपन 1959, 1960)
● अॅड्रियानो पनाटा (पुरुष, फ्रेंच ओपन 1976)
● यानिक सिनर (पुरुष, ऑस्ट्रेलियन ओपन 2024)
● फ्रान्सिस्का शियावोन (महिला, फ्रेंच ओपन 2010)
● फ्लॅविया पेनेटा (महिला, अमेरिकन ओपन, 2015)

ऑस्ट्रेलियन ओपन
● सुरवात : 1905
● 2024 ही एकूण 112 वी स्पर्धा
● वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा
● कोर्ट : हार्ड कोर्टवर खेळवली जाते

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *