अमेरिकेत रंगलेल्या 81 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात ‘ओपेनहायमर’ या चित्रपटाने बाजी मारली. सर्वोत्कृष्ट चित्रपटासह पाच पुरस्कार या चित्रपटाला मिळाले. या चित्रपटाचा नायक सिलियन मर्फी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. अमेरिकी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटांमधील आणि दूरचित्रवाणी मालिकांमधील उत्कृष्ट कलाकृतींचे अनेक कलाकारांचे कौतुक करण्यासाठी 1944 पासून दरवर्षी ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. समारंभ 7 जानेवारी 2024 रोजी, बेव्हरली हिल्स, कॅलिफोर्निया येथील द बेव्हरली हिल्टन येथून थेट प्रक्षेपित करण्यात आला.
अधिक माहिती
● ‘ओपेनहायमर’ या चरित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता, सहाय्यक अभिनेता, गीत असे पाच पुरस्कार मिळाले.
● ‘पुअर थिंग्स ‘या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला.
● सर्वोत्कृष्ट चित्रपट : ‘ओपेनहायमर’
● विनोदी चित्रपट: पुअर थिंग्स
● दूरचित्रवाणी मालिका: सक्सेशन
● अभिनेता : सिलियन मर्फी (ओपेनहायमर)
● अभिनेत्री: लिली ग्लेडस्टोन (किलर्स ऑफ द फ्लॉवर मून)
● सहाय्यक अभिनेता: रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर (ओपेनहायमर)
● सहाय्यक अभिनेत्री :दा विनी जॉय रुडाल्फ(द होल्ड ओव्हर्स)
● सर्वोत्कृष्ट एनिमेशनपट: द बॉय अँड द हेरॉन
● सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: ख्रिस्तोफर नोलान (ओपेनहायमर)