देशाच्या औद्योगिक उत्पादनात डिसेंबर 2023 मध्ये सुधारणा झाली असून ते 3.8 टक्के वाढले आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केली. कारखान्यांतून होणाऱ्या उत्पादनाचे अर्थात औद्योगिक उत्पादनाचे मोजमाप औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या (आयआयपी) स्वरूपात केले जाते.
अधिक माहिती
● यापूर्वी डिसेंबर 2022 मध्ये आयआयपी 5.1 टक्के वधारला होता.
● राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2023 मध्ये वस्तूनिर्मिती – (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्राचे उत्पादन 3.9 टक्के वाढले. हे उत्पादन डिसेंबर 2022 मध्ये 3.6 टक्के होते.
● डिसेंबर 2023 मध्ये खाणकाम उद्योगातून निघणारे उत्पादन 5.1 टक्के आणि वीजनिर्मिती क्षेत्रातून निघणारे विजेचे उत्पादन 1.2 टक्के वाढले आहे.
● एप्रिल ते डिसेंबर 2023 या काळात आयआयपी 6.1 टक्के वाढला आहे.
● एप्रिल ते डिसेंबर 2022 मध्ये आयआयपी 5.5 टक्के नोंदवला गेला होता.