कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्या. पी.बी. वराळे यांना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायाधीश म्हणून शपथ दिली. केंद्र सरकारने न्या. वराळे यांच्या नावाला हिरवा कंदील दाखविल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात त्यांचा शपथविधी झाला. न्या. वराळे यांच्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या सर्व 34 जागा आता भरल्या गेल्या आहेत.