निलय विपिनचंद्र अंजारिया यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राजभवनाच्या ग्लास हाउसमध्ये झालेल्या समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना शपथ दिली. या वेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी, कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अधिक माहिती
● न्यायमूर्ती पी. एस. दिनेश कुमार निवृत्त झाले आणि अंजारिया यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
● अंजारिया यांची नोव्हेंबर 2011 मध्ये गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
● त्यांच्या नावाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने या महिन्याच्या सुरवातीला केली होती.