● प्रसिद्ध उडिया कवी आणि माजी सनदी अधिकारी रमाकांत रथ यांचे खारवेलनगर भागातील निवासस्थानी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले.
● रथ यांना ‘पद्मभूषण’ने सन्मानित करण्यात आले होते
● रथ यांचा जन्म 13 डिसेंबर 1934 रोजी कटक येथे झाला.
● तत्कालीन रेव्हनशॉ कॉलेजमधून त्यांनी इंग्रजी साहित्यात एम. ए. केले. त्यानंतर ते 1957 मध्ये भारतीय प्रशासन सेवेत (आयएएस) रुजू झाले.
● राज्य आणि केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषविल्यानंतर रथ, 1992 मध्ये ओडिशाचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले.
● केते दिनारा (१९६२), अनेका कोठारी संदिग्धा मृगया (१९६७), (१९७१), सप्तम ऋतू (१९७७), सचित्र अंधार (१९८२), श्री राधा (१९८५) आणि श्रेष्ठ कविता (१९९२) हे रथ यांचे प्रमुख काव्यसंग्रह आहेत.
● त्यांच्या काही कविता इंग्रजी व इतर भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत.
● रथ यांना 1977 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, 1984 मध्ये सरला पुरस्कार,
● 1990 मध्ये विश्वा सन्मान आणि 2009मध्ये साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले.
● साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा 2006 मध्ये ‘पद्मभूषण’ ने सन्मानित ‘करण्यात आले.
● त्यांनी 1993 ते 1998 या काळात साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष आणि 1998 ते 2003 या काळात अकादमीचे अध्यक्ष म्हणून काम केले.