कोनेरू हम्पीला विजेतेपद
- भारताच्या कोनेरू हम्पीने इंडोनेशियाच्या इरीन सुकंदरला नमवत ऐतिहासिक दुसऱ्यांदा जागतिक जलद (रॅपिड) बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद मिळवले.
- हम्पीने 2019 मध्ये जॉर्जिया येथे झालेल्या स्पर्धेतही अजिंक्यपद पटकावले होते.
- भारताची आघाडीची महिला बुद्धिबळपटू चीनच्या जू वेन्जूननंतर एकहून अधिक जेतेपद मिळवणारी दुसरी बुद्धिबळपटू ठरली.
- 37 वर्षीय हम्पीने संभावित 11 पैकी 8.5 गुणांची कमाई केली.
- हम्पीने याआधी 2012 मध्ये मॉस्को येथे कांस्य, तर 2023 मध्ये उझबेकिस्तान मधील समरकंद येथे रौप्य पदक मिळवले होते.
- रशियाच्या 18 वर्षीय वोलोडर मुर्जिनने याच प्रारूपातील पुरुष गटाचे जेतेपद मिळवले.
- ही स्पर्धा न्यूयॉर्क येथे झाली.
माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन
- ठाणे महापालिकेचे प्रथम नगराध्यक्ष, प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले.
- ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत प्रधान यांनी मोठे योगदान दिले होते.
- ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष म्हणून 1974-81 या कालावधीत सतीश प्रधान यांनी काम पाहिले.
- शहरात शिवसेना पक्षाचा पाया रोवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
- 1986-87 या काळात त्यांनी शहराचे पहिले महापौरपद भूषविले.
- दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि राम गणेश गडकरी रंगायतन उभारण्यात सतीश प्रधान यांचा महत्त्वाचा वाटा होता.
पेंगाँग सरोवराजवळ शिवरायांचा पुतळा
- लडाखमध्ये 14,300 फूट उंचीवर पेंगाँग सरोवराच्या काठावर भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे.
- या पुतळ्याचे नुकतेच अनावरण झाले असून, चीनलगत असलेल्या सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हा पुतळा उभारण्यात आला आहे.
- लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
- ‘या महान राजाबद्दलचा आदर आणि त्यांनी दिलेला वारसा कायमच प्रेरणेचा स्रोत असल्यामुळे हा पुतळा उभारण्यात आला आहे,’ असे लष्कराच्या 14 व्या तुकडीने म्हटले आहे.
- हा पुतळा येणाऱ्या काळात अनेक पिढ्यांना लढण्याची प्रेरणा देत राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन…’ असेही लष्कराने म्हटले आहे.
- भारत–चीनमधील वादानंतर सैन्यमाघारीनंतर हा पुतळा उभारण्यात आला आहे.
- लष्कराकडून देशाच्या विविध सीमांवर प्रेरणास्थळे म्हणून विविध पुतळे उभारण्यात येतात. शत्रूशी दोन हात करताना त्यातून प्रेरणा मिळते
भारताकडून ऑस्ट्रेलियाला होणाऱ्या निर्यातीत वाढ
- नोव्हेंबर महिन्यात भारताकडून ऑस्ट्रेलियाला होणाऱ्या निर्यातीमध्ये 64.4 टक्के वाढ झाली आहे.
- ऑस्ट्रेलिया हा भारताचा व्यापारी भागीदार देश आहे.
- वस्त्रोद्योग, रसायने आणि कृषी उत्पादने अशा क्षेत्रांमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताकडून 643.7 दशलक्ष डॉलरची आयात केली.
- दोन्ही देशांनी दोन वर्षांपूर्वी – 29 डिसेंबर, 2022 रोजी – आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (ईसीटीए) केला.
- आता या कराराची व्याप्ती वाढवून तो सर्वंकष आर्थिक सहकार्य करार (सीईसीए) करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान वाटाघाटी सुरू आहेत.
कसोटीत बुमराचे 200 विकेट पूर्ण
- भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेटचा टप्पा पूर्ण केला.
- रवींद्र जडेजासह सर्वात वेगवान 200 विकेट मिळवणाराही गोलंदाज ठरला.
- या दोघांनी 44 कसोटींत ही कामगिरी केली आहे.
- 200 कसोटी विकेट मिळवणारा बुमरा 12वा भारतीय गोलंदाज
- भारताकडून एक सर्वात वेगात 200 विकेट मिळवण्याचा विक्रम आर. अश्विन याच्या नावावर आहे. त्याने 37 कसोटीतच ही कामगिरी केली होती.
- मेलबर्न क्रिकेट मैदानावर ट्रेव्हेस हेड ला बाद करून बुमराने आपला 200 विकेटचा टप्पा पूर्ण केला.
विक्रमवीर बुमरा
- बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराने 200 कसोटी बळींचा विक्रम पार केला.
- 20 किंवा त्याहून कमी धावांच्या सरासरीने कसोटी क्रिकेटमध्ये 200 विकेट मिळवणारा बुमरा क्रिकेट विश्वात पहिला गोलंदाज ठरला.
कमीत कमी सरासरीत 200 पेक्षा अधिक विकेट घेणारे गोलंदाज
1) जसप्रीत बुमरा (भारत) 200 विकेट – 19.56 सरासरी
2) माल्कम मार्शल (विंडीज) 376 विकेट– 20.94
3) जुवेल गार्नर (विंडीज)259 विकेट – 20
4) कर्टली अॅम्बोस (विंडीज)405 विकेट – 20.99
5) जेम्स अँडरसन (इंग्लंड)704 विकेट– 26.45
6) ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)563 विकेट – 21.64 सरासरी.