इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवत आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या भारताच्या जसप्रीत बुमराने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीतील गोलंदाजांच्या यादीत अग्रस्थानी झेप घेतली आहे. कसोटी क्रमवारीत अग्रस्थान मिळवणारा बुमरा हा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.
अधिक माहिती
● कसोटी क्रमवारीतील गोलंदाजांच्या यादीत अग्रस्थान मिळवणारा बुमरा हा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.
● भारतीय क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांमध्ये गणना होणारे कपिल देव दुसऱ्या, तर झहीर खान तिसऱ्या स्थानापर्यंत पोहोचले होते.
● कसोटी क्रमवारीतील गोलंदाजांच्या यादीत अग्रस्थानी झेप घेणारा बुमरा हा भारताचा एकूण चौथा गोलंदाज ठरला आहे.
● यापूर्वी बिशन सिंग बेदी, अश्विन आणि जडेजा यांनी अशी कामगिरी केली होती. दिवंगत माजी कर्णधार बेदी, तसेच जडेजा हे डावखुरे फिरकीपटू असून, अश्विन ऑफ-स्पिनर आहे.