मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
- हिंदीचित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.
- केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी या पुरस्काराची घोषणा केली .
- 8 ऑक्टोबररोजी 70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
मिथुन यांची कारकीर्द
- मिथुनयांनी 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मृगया’ या चित्रपटातून अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली.
- त्यांच्याया पहिल्याच सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
- त्यांनीआपल्या कारकीर्दीत बंगाली, हिंदी, तेलुगू, कन्नड, ओडिया आणि भोजपुरी अशा विविध भाषांमध्ये काम केले.
- ‘डिस्कोडान्सर’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘स्वर्ग से सुंदर’, ‘हम पाँच’, ‘साहस’, ‘वारदात’, ‘बॉक्सर’, ‘प्यारी बहना’, ‘प्रेम प्रतिज्ञा’, ‘मुजरिम’ आणि ‘अग्निपथ’ यांसारख्या 350 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
- त्यांनी2009 ते 18 या काळात ‘डान्स इंडिया डान्स’ या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी सीरिजमध्ये मुख्य परीक्षक किंवा ‘ग्रँडमास्टर’ म्हणूनही काम केले.
- राज्यसभेचेमाजी सदस्य चक्रवर्ती यांनी 2021च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
- अलीकडीलकाळात ‘गोलमाल-3’, ‘सी कंपनी’, ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटांत ते दिसले होते.
दादासाहेब फाळके पुरस्कार
- दादासाहेबफाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे.
- इ.स. 1969 मध्येदादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे.
- हापुरस्कार माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार तर्फे दिला जातो.
- दरवर्षीभरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वितरण केले जाते.
- यापुरस्कारामध्ये सुवर्ण कमळ पदक, एक शाल आणि रोख बक्षीस ₹10,00,000 यांचा समावेश आहे.
- दादासाहेबफाळके ज्यांना “भारतीय चित्रपटाचे जनक” म्हणून ओळखले जाते, ते भारतीय चित्रपट निर्माते होते ज्यांनी भारतातील पहिला पूर्ण-लांबीचा चित्रपट, राजा हरिश्चंद्र (1913) दिग्दर्शित केला होता.
- पहिल्यादादासाहेब फाळके पुरस्काराने देविका राणी यांना सन्मानित करण्यात आले होते
काझिंद सराव – 2024
- भारतआणि कझाकस्तान या देशांच्या सेनांच्या काझिंद-2024 या आठव्या संयुक्त लष्करी सरावाला उत्तराखंडमधील औली येथील सूर्य परदेशी प्रशिक्षण केंद्रात सुरुवात झाली.
- दिनांक30 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर 2024 या कालावधीत हा सराव होणार आहे.
- वर्ष2016 पासून दर वर्षी दोन्ही देशांच्या लष्करांच्या सहकार्याने काझिंद नामक संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात येतो.
- गेल्यावर्षी 30 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2023 या कालावधीत कझाकस्तान येथील ओटार येथे हा संयुक्त सराव पार पडला होता.
- लष्कराच्याकुमाऊ रेजिमेंटतर्फे इतर शस्त्रास्त्रे आणि सेवा यांसह भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या तुकडीत भारतीय सशस्त्र दलांतील 120 जवानांसोबत भारतीय हवाई दलातील जवानांचा देखील समावेश आहे.
- कझाकस्तानच्यापथकाचे प्रतिनिधित्व मुख्यतः पायदळ आणि वायुदलाची पथके करतील.
- संयुक्तराष्ट्रांच्या चार्टर मधील भाग सात अंतर्गत उपपारंपरिक परीदृश्यात दहशतवाद प्रतिबंधक मोहिमा हाती घेण्यासाठी दोन्ही देशांच्या संयुक्त लष्करी क्षमतांमध्ये वाढ करणे हा या संयुक्त लष्करी सरावाचा उद्देश आहे.
- यासरावादरम्यान निम-शहरी आणि डोंगराळ प्रदेशांतील मोहिमांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.