- राजस्थान विधानसभेत किमान उत्पन्न हमी विधेयक –2023 आवाजी मतदानाने मंजूर झाले.
- असे विधेयक आणणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
- यानुसार राजस्थानातील ग्रामीण आणि शहरी भागातील कुटुंबांसाठी वर्षातील 125 दिवसांचा रोजगार हा कायदेशीर अधिकार ठरणार आहे.
- विधेयकात सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, पतीचे निधन झालेल्या महिला ,एकल महिला यांना महिना किमान 1000 रुपये पेन्शन मिळण्याचे प्रस्तावित आहे.


