● मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा 2025 चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला
यांना जाहीर करण्यात आला आहे.
● याआधी या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी(2022), गायिका आशा भोसले(2023) आणि अमिता भबच्चन(2024) यांचा गौरव करण्यात आला आहे.
● राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होईल.
● अभिनेत्री श्रद्धा कपूरला भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दलही या वेळी सन्मानित केले जाणार आहे. सोनाली कुलकर्णी यांना नाटक आणि चित्रपट
क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल गौरविण्यात येईल. अभिनेते सुनील शेट्टी यांनाही दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे



