कुवेतचे राजे शेख नवाफ अल अहमद अल सबाह यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांची जागा शेख मेशाल अल अहमद अल जाबेर घेण्याची शक्यता आहे. शेख नवाफ हे त्यांच्या मुत्सद्देगिरीसाठी आणि प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ओळखले जात होते.
• 2006 मध्ये त्यांना सावत्र बंधू शेख सबाह अल अहमद अल सबाह यांनी राजपुत्र म्हणून मुकुट बहाल केला होता.
• 2020 मध्ये शेख सबाह यांच्या निधनानंतर शेख नवाफ यांना अमीर (राजे) हे पद मिळालं होतं.
• त्यानंतरच्या काळात तेलाच्या दरात मोठी घसरण झाल्यानं त्यांना अर्थव्यवस्थेच्या संकटाचा सामना करावा लागला होता.
• कुवेतचे अमीर महामहिम शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांचे 16 डिसेंबर 2023 रोजी निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ, 17 डिसेंबर 2023 रोजी संपूर्ण भारतात एक दिवसाचा राजकीय दुखवटा पाळण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.
• शेख नवाफ अल अहमद अल सबाह हे गृहमंत्री (1978-1988, 2003-2006), संरक्षण मंत्री (1988-1991) आणि उपपंतप्रधान (2020-2023) होते.