भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपदी माजी अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची निवड झाल्याच्या निषेधार्थ ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय जाहीर केला.
• बजरंग पुनियाने 2020 च्या टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते.
• याआधी संजय सिंह यांच्या निवडीनंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने खेळातून निवृत्ती जाहीर केली होती.
• 2019 मध्ये बजरंग पुनियाला सन्मानित करण्यात आले होते.