देशभर झालेल्या मोठ्या गदारोळानंतर केंद्र सरकारने कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त केली. त्यानंतर आता क्रीडा मंत्रालयाने अॅड हॉक कुस्ती समिती (तात्पुरती समिती) गठित करण्यात आली आहे.
● वर्ल्ड रेसलिंग फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी निलंबित केल्यानंतर काहीच दिवसांत भारतीय ऑलिम्पिक संघाने भारतीय कुस्ती महासंघाचं कामकाज पाहण्यासाठी तात्पुरती समिती गठित केली आहे.
● भारतीय वुशु संघटनेचे अध्यक्ष भूपेंद्र बाजवा हे या समितीचे अध्यक्ष असतील. त्यांच्याबरोबर एमएम सोमाया (माजी हॉकीपट्टू) आणि मंजूषा कंवर (माजी बॅडमिंटनपट्टू) हे या समितीतले अन्य सदस्य असतील.