- पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (NASC) संकुल, नवी दिल्ली येथे 32 व्या कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या(ICAE)आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाटन केले.
- कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या (इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिस्ट, ICAE) वतीने आयोजित होणारी ही त्रैवार्षिक परिषद 02 ते 07 ऑगस्ट 2024 या कालावधीत भारतात होत आहे.
- ICAE, ही परीषद, 65 वर्षांनंतर भारतात होत आहे.
- “शाश्वत कृषी–अन्न प्रणालीच्या दिशेने परिवर्तन” ही या वर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे.
उद्दिष्ट:
- हवामानातील बदल, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास, वाढता उत्पादन खर्च आणि युध्दमय परिस्थिती यासारख्या जागतिक आव्हानांना तोंड देत शाश्वत शेतीची गरज भागवणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे.
- ही परिषद जागतिक कृषी आव्हानांशी मुकाबला करण्याच्या भारताच्या सक्रिय दृष्टिकोनावर प्रकाश टाकेल आणि कृषी संशोधन आणि धोरणातील देशातील प्रगतीचे दर्शन घडवेल.
- ICAE -2024 परीषद तरुण संशोधक आणि अग्रगण्य व्यावसायिकांना त्यांचे कार्य आणि जागतिक समवयस्कांसोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल.
- संशोधन संस्था आणि विद्यापीठे यांच्यातील सहकार्य मजबूत करणे, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील धोरणनिर्मिती प्रभावित करणे आणि डिजिटल कृषी आणि शाश्वत कृषी-अन्न प्रणालींमधील प्रगतीसह भारताच्या कृषी प्रगतीचे प्रदर्शन करणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
- या परिषदेत सुमारे 75 देशांतील सुमारे 1,000 प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
भरतनाट्यम नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती यांचे निधन
- ज्येष्ठ भरतनाट्यम आणि कुचीपुडी नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले.
- वयाच्या पाचव्या वर्षी प्रख्यात भरतनाट्यम नृत्यांगना रुक्मिणीदेवी अरुंदले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नृत्याचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.
- त्यांनी दिल्ली येथे ‘कौस्तुभ’ ह्या नृत्यशाळेची इ.स. 1959 मध्ये स्थापना केली.
- ‘संगीत भारती’ ह्या संस्थेत त्यांनी भरतनाट्यम्चे अध्यापन केले.
- तसेच विविध प्रकारचे नृत्यप्रयोगही वेळोवेळी सादर केले.
- भरतनाट्यम, कुचिपुडी व ओडिसी ह्या नृत्यप्रकारांमध्ये त्यांचे विशेष प्रभुत्व होते.
- कृष्णमूर्ती यांना 1968 मध्ये पद्मश्री,2001 मध्ये पद्मभूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाले.
- 1977 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
- अमेरिकेत झालेल्या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- या महोत्सवात उपस्थित असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर तारे-तारकांच्या उपस्थितीत प्रभावळकर यांना निर्माते अभिजीत घोलप यांच्या ‘नाफा’ या संस्थेकडून जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
- ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’ (नाफा) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या भेटीसह त्यांचे विचार ऐकण्याची संधीही उपस्थितांना मिळाली.
- ‘चिमणराव गुंड्याभाऊ, चौकट राजा, अलबत्या गलबत्या, मधील चेटकीण ‘फास्टर फेणे’ मधील भा. रा., ‘देऊळ’ मधील मास्तर, ‘बोक्या सातबंडे’चे प्रणेते आणि नाटकं गाजवणारे नाट्यकलाकार अशा बहुरंगी, बहुढंही अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना या महोत्सवात ‘जीवन गौरव पुरस्कार 2024’ देऊन सन्मान करण्यात आला.
- ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
- राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘देऊळ’ या चित्रपटाचे निर्माते आणि उद्योजक अभिजीत घोलप यांना अमेरिकेतील भारतीयांसाठी आणि विशेषतः मराठी सिनेरसिकांसाठी अमेरिकेच्या मातीत मराठी सिनेमा आणि सिनेमासंस्कृती रूजवायची आहे. त्या उद्देशाने त्यांनी पहिल्यांदाच तिथे मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले होते.
- अमेरिकेतच निर्मिती करण्यात आलेले ‘पायरव’ आणि ‘निर्माल्य’ हे दोन लघुपटही या महोत्सवात पहिल्यांदाच प्रकाशित करण्यात आले.
झेंगला सुवर्ण
- चीनच्या किनवेन झेंग हिने पॅरिस ऑलिम्पिकमधील टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत सुवर्णपदक पटकावले.
- अशी कामगिरी करणारी ती चीनची पहिलीच टेनिसपटू ठरली.
- अंतिम लढतीत झेंगने क्रोएशियाच्या डॉना व्हेकिचला 6-2, 6-3 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले.
- टेनिसमध्ये चीनला दुसऱ्यांदाच सुवर्णपदक मिळाले.
- यापूर्वी, 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये चीनच्या तिंग ली आणि तियानतियान सन यांनी महिला दुहेरीत सुवर्णपदक पटकावले होते.