Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘कॅम्लिन’ चे सुभाष दांडेकर यांचे निधन

  • सामाजिक भान, कलेची जाण व उद्यमशीलता अंगी बाळगणारे ‘कॅम्लिन फाइन सायन्सेस’चे संस्थापक व ‘कोकुयो कॅम्लिन’चे मानद अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले.
  • चित्रकलेसाठीच्या साहित्य व निर्मितीतील अग्रेसर अशा कॅम्लिन उद्योग समूहाची धुरा सुभाष दांडेकर यांनी गेली अनेक वर्षे सांभाळली होती.
  • कला आणि उद्योग क्षेत्रासह विशेषतः कॅम्लिन कुटुंबातील अनेकांसाठी ते मार्गदर्शक होते.
  • त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक भान जपले आणि स्वयंसेवी संस्थांनाही सहकार्य केले.
  • ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ चे ते माजी अध्यक्ष होते.
  • सरकारने विविध नगरविकास उपक्रमांसाठी त्यांची नियुक्तीकेली होती.
  • उद्योग क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘गेम चेंजर्स ऑफ महाराष्ट्र’, ‘लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड’ अशा पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले.
  • काळानुसार बदलत गेलेल्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून सतत नवे प्रयोग करण्यावर त्यांनी भर दिला.
  • त्याच वेळी उत्पादनांची गुणवत्ता व मूल्यांशी कधीच तडजोड केली नाही.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *