Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

केन-बेटवा नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी

केन-बेटवा नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी

बैजू पाटील यांना इंडोनेशियाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी पुरस्कार जाहीर

  • प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना इंडोनेशियाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी२०२४ हा पुरस्कार जाहीर झाला
  • एकूण 31 देशांतील छायाचित्रकारांच्या 65 हजार छायाचित्रांमधून बैजू यांचा जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातील हत्तींचे छायाचित्र अव्वल ठरले.
  • बैजू यांना आतापर्यंत 40 पेक्षा जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
  • अत्याधुनिक कॅमेऱ्याने स्वतःचे कौशल्य अनुभव वापरून बैजू यांनी कलात्मक पद्धतीने हत्तींचे छायाचित्र पहिल्यांदाच काढले आहे.
  • जिम कॉर्बेटमध्ये भ्रमंती करीत असताना त्यांना हत्तींचा कळप दिसला. त्या क्षणी त्यांच्या बाजूने मोठा हत्ती जात होता. त्या हत्तीच्या पायातून समोरील कळपाचे छायाचित्र त्यांनी काढले.

केनबेटवा नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मध्य प्रदेशातील खजुराहो येथे केनबेटवा नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी केली
  • पंतप्रधान मोदींनी भारतातील प्रमुख नदी खोऱ्याच्या प्रकल्पांसाठी डॉ. बी.आर. आंबेडकरांच्या दूरदृष्टीचे श्रेय दिले

केनबेटवा प्रकल्प

  • 65 लाख नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणार
  • मध्य प्रदेशातील 10 जिल्ह्यांना फायदा
  • प्रकल्पासाठी 44, 605 कोटी रुपये खर्च अपेक्षित
  • 7.18 लाख शेतकरी कुटुंबांना फायदा
  • 103 मेगावॉट जलविद्युत आणि 27 मेगावॉट सौरऊर्जेतून वीजनिर्मिती

गरुड : अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता

  • अमेरिकेत गरुड पक्ष्याला सामर्थ्य आणि ताकदीचे प्रतीक मानले जाते. या पक्ष्याला मिळणारा हा मान आता अधिकृत झाला आहे
  • मागील सुमारे अडीचशे वर्षांपासून अमेरिकेच्या सामर्थ्याच्या प्रतीक बनलेल्या गरुडाला (बाल्ड ईगल) अखेरराष्ट्रीय पक्षीम्हणून दर्जा देण्यात आला आहे.
  • अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी याबाबतच्या विधेयकावर सही करत त्याचे कायद्यात रूपांतर केले आहे
  • पांढरे डोके, गर्द पिवळी चोच आणि गडद तपकिरी रंगामुळे हा अत्यंत देखणा पक्षी सहज ओळखू येतो.
  • या पक्षाला राष्टीय पक्षाचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती
  • अमेरिका सरकारच्या सरकारी कागदपत्रांवर 1782 पासून या गरुडाचे चित्र आहे.

पार्कर सोलर प्रोबची विक्रमी कामगिरी

  • अमेरिकेची अवकाश संशोधन संस्थानासाचे सौरयानपार्कर सोलर प्रोबसूर्याच्या सर्वांत जवळ पोहोचले आहे
  • हा विक्रम करणारे हे पहिलेच मानवनिर्मित यान आहे
  • पार्करने सूर्याच्या अत्यंत जवळ पोहोचून इतिहास रचला आहे
  • सूर्याच्या त्याच्या बाह्य वातावरणाबद्दल महत्त्वाची माहिती गोळा करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
  • स्पेस डॉट कॉमनुसार भारतीय वेळेनुसार 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजून 23 मिनिटांनीपार्करसूर्याच्या पृष्ठभागापासून सर्वांत जवळच्या अंतरावरून उडाले.
  •  यान सूर्यापासून 61 लाख किलोमीटर दूर होते.
  •  एवढ्या अंतरापर्यंत गेलेले हे एकमेव यान आहे.
  •  सूर्याच्या जवळ असल्याने तप्त तापमानाचा सामना करीत ते तेथे पोहोचले.

मोहिमेचा हेतू निरीक्षणे

  • केवळ विक्रमासाठी सूर्याच्या अधिक जवळ जाऊन आणि 980 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान सहन करणे, हे उद्दिष्ट नाही
  • शास्त्रज्ञांना आजपर्यंत कोड्यात टाकणारी मोठी रहस्ये सोडविण्याचेनासाचे ध्येय
  • सूर्याच्या वातावरणाच्या बाह्य भागात (कोरोना) मोठी रहस्ये आहेत
  • शास्त्रज्ञांच्या निरीक्षणानुसार सूर्यापासून एका विशिष्ट अंतरावरकोरोनाचे तापमान 11 लाख अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असू शकते
  • सूर्यापासून एक हजार 600 किलोमीटर जवळ असतानाकोरोनाचे तापमान केवळ 4 हजार 100 अंश सेल्सिअसने कमी झाले आहे.

 ‘भीमचीक्रायसमवेत भागीदारी

  • भारत इंटरफेस फॉर मनीअर्थातभीमया नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पेमेंट प्रणालीनेक्रायया मागास वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेबरोबर भागीदारी केली आहे
  • या भागीदारीबरोबरभीमक्राययांनीगिफ्ट हॅपीनेसया मोहिमेची घोषणा केली
  • या उपक्रमाचा उद्देश देशभरातील वंचित मुलांसाठी नवीन वर्षाच्या त्यांच्या इच्छा पूर्ण करून त्यांना आनंद देणे आहे.
  • 16 डिसेंबरपासून ही मोहीम सुरू झाली असून, ती 31 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यानभीमअॅपवर केलेला प्रत्येक व्यवहारगिफ्ट हॅपिनेससाठी हातभार लावणार आहे.
  • गिफ्ट हॅपीनेसही मोहीम यूजरना दैनंदिन वर्तनात बदल करता, त्यांच्या नियमित पेमेंटसाठीभीमअॅपचा वापर करण्यास प्रोत्साहन देत आहे
  • डिजिटल पेमेंटला चालना मिळणार असल्यामुळे लाभ या मुलांना देणे शक्य होईल.

टेन  चिल्ड्रन उपक्रम

  • रेनबो अंब्रेला फाउंडेशन, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आणि सेवा सहयोग फाउंडेशनचाटेन चिल्ड्रनहा आंतरराष्ट्रीय उपक्रम नुकताच पार पडला
  • हा उपक्रम अमेरिका, जर्मनीनंतर भारतात झाला
  • डेनिस मायर आणि लिझाबेथ कोलटॉफ हे नेदरलँडचे रंगकर्मी या उपक्रमाचे जनक आहेत.
  • या उपक्रमात ‘गरिबी आणि मुली’ या विषयावर नाटक, लघुपट, कलाप्रदर्शन आणि परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त माहिती पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *