कोरोनाचे विषाणू सातत्याने स्वतःमध्ये बदल घडवून आणत आहेत. त्यामुळे नवनव्या विषाणूंची उत्पत्ती होत आहे. कोरोनाचा नवा विषाणू असलेल्या ‘जेएन1’ चे रुग्ण चीन आणि अमेरिकेमध्ये सापडत असून त्याचा भारतातील पहिला रुग्ण हा केरळमध्ये सापडला आहे. भारतीय सार्स कोरोना जिनोमिक कर्न्सटीयम अंतर्गत सुरू असलेल्या कोरोना चाचणी दरम्यान 79 वर्षीय महिलेला ‘जीएन1’ ची बाधा झाल्याचे आढळते.
• ८ डिसेंबर 2023 रोजी केरळ मधील तिरुअनंतपुरम येथील काराकुलम या ठिकाणी एका वृद्ध महिलेला ‘जेएन1’ ची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. या महिलेची 18 नोव्हेंबर रोजी कोरोनाविषयी चाचणी घेण्यात आली.
• तिला सौम्य प्रकारची लक्षणे आढळली होती. तसेच तिला थोडासा अशक्तपणाही जाणवत होता.
• ‘जेएन 1’ हा कोरोनाचा उपप्रकार ‘बीए. 2.86’ या गटातील आहे. सामान्यतः तो पिरोला म्हणून ओळखला जातो.
• कोरोनाच्या नव्या विषाणूचा रुग्ण सापडलेल्या परिसरातील परिस्थितीचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून निरीक्षण करण्यात येत आहे.