कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार बँकिंग क्षेत्रातील सुमारे साडेतीन दशकांचा अनुभव असलेल्या अशोक वासवानी यांनी स्वीकारला. याचबरोबर बँकेच्या अध्यक्षपदी सी.एस .राजन यांची निवड करण्यात आली आहे.
बँकेचे संस्थापक संचालक उदय कोटक हे बँकेच्या प्रमुख पदावरून 1 सप्टेंबर 2023 रोजी पायउतार झाले होते. त्यानंतर हंगामी स्वरूपात ही जबाबदारी दीपक गुप्ता यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
अधिक माहिती
● आता वासवानी यांनी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा स्वीकारली आहे.
● वासवानी हे मुंबईतील सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर ते सनदी लेखापाल आहेत.
● याआधी त्यांनी बारकलेज बँकेत काम केले आहे.
● इस्राईल मधील कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानातील फिनटेक असलेल्या पागया टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
● कोटक महेंद्र बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेले राजन हे निवृत्त सनधी अधिकारी आहेत.
बँकेचे अध्यक्ष प्रकाश आपटे यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2023 रोजी संपल्यानंतर त्यांच्या जागी राजन यांची निवड झाली आहे.


